भाजप आणि ओवैसीच खरे राम आणि श्याम; राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

भाजप आणि ओवैसीच खरे राम आणि श्याम; राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

Sanjay Raut : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. दोन्ही गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, की एमआयएमचे ओवैसी आणि भाजपा हेच खरे रामश्याम आहेत. शिवसेना मात्र आपल्या पायावर मजबूतीने उभी आहे. जे सोडून गेले त्यांची पर्वा नाही, अशा शब्दांत त्यांनी पाटील यांचा समाचार घेतला.

हे सुद्धा वाचा : Sanjay Raut : पूर्वीचे देवेंद्र फडणवीस आणि आताचे देवेंद्र फडणवीस यामध्ये खूप फरक आहे

याआधी मंत्री पाटील म्हणाले होते, की ओवैसी जर उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) जाणार नसतील तर सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेच ओवैसीकडे जातील. या मुद्द्यावर राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट आहेत. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्यांचा खरा गौरव करावा. आम्ही मागणी केली की त्यांच्या तोंडाला फेस येतो, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.

Sanjay Raut : कायदा काय तुमच्या घरी काय नाचायला ठेवला आहे का?

दरम्यान, याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की उद्धव ठाकरे यांच्याकडे आता राहिले तरी काय, जे काही आमदार आहेत ते सुद्धा निवडणुकीपर्यंत राहतील की नाही याचा भरवसा नाही. जे लोक उद्धव ठाकरे यांना सोडून गेले आहेत ते काय बोलतात याचे आत्मपरिक्षण उद्धव ठाकरे यांनी करावे, असा सल्ला मंत्री राणे यांनी दिला होता.

https://www.youtube.com/watch?v=K33fjKe-Hyo

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube