Sanjay Raut : कायदा काय तुमच्या घरी काय नाचायला ठेवला आहे का?

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (76)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. कायदा काय तुमच्या घरी नाचायला ठेवला आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी  मला मारण्यासाठी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde ) यांनी राजा ठाकूर याला सुपारी दिली असल्याचा आरोप राऊतांनी केला होता.

संजय राऊत यांनी राजा ठाकूरवर आरोप केल्यानंतर राजा ठाकूरच्या पत्नीने राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने शिंदे गटाने त्यांच्याविरोधात मोर्चे काढले आहेत. या सगळ्यावर राऊतांनी टीका केली आहे. जे काही मोर्चे निघत आहेत, ते कायद्याचे राज्य असल्याचे लक्षण नाही आहे. एखाद्याने तक्रार केली म्हणून त्याचा दहशतवाद होता कामा नये. ज्याने तक्रार केली त्याची चौकशी करायला पाहिजे.  कायदा काय तुमच्या घरी नाचायला ठेवला आहे का?, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर केली आहे.  तसेच एका गुंडाच्या समर्थनासाठी एक पक्ष रस्त्यावर उतरतो आहे. जो पक्ष घटनाबाह्य आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा प्रयत्न असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

(राऊतांच्या अडचणीत वाढ! श्रीकांत शिंदेंची बदनामी केल्याप्रकरणी ठाण्यानंतर आता बीडमध्येही गुन्हा दाखल)

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील कटुता संपवावी असे भाष्य केले आहे. त्यावर देखील राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला फोडण्याचे काम भाजपनेच केले आहे. त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला.  अशा प्रकारे निकाल विकत घेऊन पक्ष संपवता येत नाही. कटुता संपवण्याची आमची देखील इच्छा आहे, पण ज्यापद्धतीने आमच्याशी तुम्ही वागलात त्यामुळे कटुता आणखी वाढली आहे, असे राऊत म्हणाले आहेत.

Tags

follow us