Download App

Maharashtra Politics : आज गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात; जागावाटपाचा तिढा सुटणार?

Union Home Minister Amit Shah in Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election) महाराष्ट्रात महायुतीचे जागावाटप रखडले आहे. याच कारणामुळे भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. राज्यातील काही जागांवर पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah in Maharashtra) महाराष्ट्रात येत आहेत. सुरुवातीला अकोला, नंतर जळगाव आणि संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यात अमित शाह आढावा बैठकाही घेणार आहेत. त्यामुळे राज्यातीला जागावाटपाचा तिढा सुटेल असे सांगण्यात येत आहे.

Amit Shah : नवे फौजदारी कायदे ते हिट अँड रनची प्रकरणं; इंग्रजी पाऊलखुणा मिटवण्याचं अमित शाह यांचं लक्ष्य

महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जास्त जागा मागितल्या गेल्याने जागावाटपात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता अमित शाह मुंबई, उत्तर मु्ंबई आणि विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. या बैठकीत पदाधिाकाऱ्यांचा मते जाणून घेण्यात येतील. लोकसभा निवडणुकीची रणनीती या बैठकांत ठरवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

महायुतीत 30 ते 32 जागांवर भाजपने उमेदवार द्यावेत, असे भाजप नेत्यांचे मत आहे. मात्र शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी तयार नाही. या दोन्ही पक्षांकडून एकूण 38 जागा मागितल्या गेल्या आहेत. भाजप 30 आणि मित्रपक्षांना 18 जागा असा तोडगा अमित शाह कदाचित काढू शकतात असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर ते बैठकही घेण्याची शक्यता आहे.

भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. आता दुसरी यादी 6 मार्च रोजी म्हणजेच उद्या येईल अशी शक्यता आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे यावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अमित शाह आजच जागावाटपाचा तिढा निकाली काढतील अशी शक्यता आहे. त्यासाठीच आज त्यांचा महाराष्ट्र दौरा निश्चित करण्यात आला आहे. आता या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाचा कोणता फॉर्म्युला समोर येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इंडिया आघाडीतील पक्षांना घराणेशाहीची चिंता, ठाकरे-पवारांचे उद्दिष्ट फक्त; अमित शाहांची घणाघाती टीका

follow us