Download App

विमल मुंदडा ते तानाजी सावंत, आरोग्यमंत्र्यांच्या राजकारणाचा शेवट असा का होतो?

  • Written By: Last Updated:

Politics Of Health Ministers : राजकारणात एखादे मिथक असतं. जसं की रामटेक बंगला. हा बंगला मिळालं की मंत्रिपद जातं. भ्रष्टाचाराचा आरोप होतो. या बंगल्यात राहणारा कधी मुख्यमंत्री होत नाही. तसंच मंत्रालयातील दालन 602 बाबत आहे. 1999 मध्ये छगन भुजबळांना हे दालन मिळाले होते. पण 2003 ला बनावट स्टॅम्प घोटाळ्यात भुजबळांचे मंत्रिपद (Maharashtra Politics) गेले. नंतर अजित पवार, एकनाथ खडसे यांना हे दालन मिळाले होते. अजितदादांना सिंचन घोटाळा अंगलट आला, तर खडसेंना जमीन घोटाळ्यात घरी जावे लागले. तसेच मिथक हे आरोग्यमंत्र्यांबाबत. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन (Health Minister) झालंय. अन् आरोग्यमंत्रिपद हे प्रकाश आबिटकर यांच्या पारड्यात गेलंय. आतापर्यंतचा इतिहास पाहता आरोग्यमंत्र्यांच्या कारकि‍र्दीचा शेवट हा काहीसा वेगळा होताना दिसतो, म्हणजे काय? तर आरोग्यमंत्रिपद मिळाल्यानंतर त्या नेत्याची पुन्हा राजकीय कारकीर्द फुलली नसल्याचं दिसतंय.

12 मार्च 1985 ते 26 जून 1988 या कालावधीमध्ये भालचंद्रभाई सावंत आरोग्यमंत्री होते. त्यांच्या काळात जे. जे. हॉस्पिटलमध्ये उद्योगाला पुरवण्यात येणारं ग्लिसरीन रुग्णांना दिलं गेलं. त्यातून किडनी फेल झाल्याने 13 पेशंट दगावले. त्यावर जस्टनी लेंटिन यांचे कमिशन नेमले गेले. त्यांचा अहवाल आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी स्वार्थासाठी कपाटातच ठेवला; मात्र भाई सावंत यांची राजकीय कारकीर्दीला फुलली नाही.

प्रवाशांचा वेळ वाचणार; अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता…

6 मार्च 1993 ते 18 नोव्हेंबर 1994 या कालावधीत पुष्पाताई हिरे आरोग्यमंत्री होत्या. त्यावेळी मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न समोर आला. नंतर त्याही सक्रिय राजकारणात दिसल्या नाहीत. त्यांच्यानंतर दोन वेळा दौलतराव आहेर आणि एकवेळ बबनराव घोलप आरोग्यमंत्री झाले; पण दोघांचीही राजकीय कारकीर्द या मंत्रिपदाच्या पुढे गेलीच नाही. 27 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 या काळात दिग्विजय खानविलकर आरोग्यमंत्री होते. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 9 नोव्हेंबर 2004 ते 1 डिसेंबर 2008 काळात विमल मुंदडा आरोग्यमंत्री झाल्या. त्यानंतर त्यांचे कर्करोगाने निधन झाले. 8 डिसेंबर 2008 ते 6 नोव्हेंबर 2009 मध्ये राजेंद्र शिंगणे आरोग्यमंत्री झाले.

7 नोव्हेंबर 2009 ते 26 सप्टेंबर 2024 अशी मोठी कारकीर्द काँग्रेस नेते सुरेश शेट्टी यांना आरोग्यमंत्री म्हणून मिळाली. त्यांनी देखील चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, अधिकाऱ्यांना देखील जेरीस आणलं. परिणामी त्यानंतर शेट्टी निवडणुकीमध्ये पराभूत झाले. पुढे त्यांना उमेदवारीसुद्धा मिळाली नाही. युती सरकारच्या काळात 5 डिसेंबर 2014 ते 7 जानेवारी 2019 अशी कारकीर्द डॉ. दीपक सावंत यांना मिळालं. याच कालावधीत 290 कोटींच्या औषध खरेदीचा घोटाळा उघड झाला.

आणखी एक दुर्घटना! दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमान अपघात, लॅंडिंगदरम्यान उडाला आगाची भडका

प्रकरण आजही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आहे. सावंतही सक्रिय राजकारणातून बाजूला गेले. त्यांच्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राजेश टोपे आरोग्यमंत्री झाले. 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 असा मोठा कालावधी त्यांना मिळाला. याच काळात ‘कोविड’ची साथ आली. टोपेंनी देखील उत्तम काम केले, पण त्यांच्याकाळात घोटाळ्याचे आरोप झाले आहे. त्यानंतर या निवडणुकीत टोपे निवडूनही आले नाहीत. 14 ऑगस्ट 2022 ते 26 नोव्हेंबर 2024 या काळात तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते. त्यांच्यावरही विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णवाहिका खरेदीमध्ये साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. यंदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांचा निसटता विजय झाला. शिवाय त्यांचं मंत्रिपदही गेलंय.

 

follow us