शिंदे सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांना ब्रेक? ‘माझी शाळा’ आणि ‘आनंदाचा शिधा’ यंदा थंडावले…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू आहे.

Eknath Shinde News

Majhi Shala Sunder Shala Scheme Eknath Shinde : राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या योजनेला यंदा ब्रेक लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सुरू झालेल्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना सध्या थंड बस्त्यात गेल्याचेही बोलले जात आहे.

योजनेचा उद्देश

राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास, आधुनिक सुविधा आणि परिसराचे सौंदर्यीकरण (Majhi Shala Sunder Shala) या उद्देशाने 5 डिसेंबर 2023 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी ही एक प्रमुख योजना मानली गेली होती. या योजनेत (Maharashtra Politics) राज्यभरातील शाळांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर या स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग झाला. विजेत्या शाळांना लाखो रुपयांची पारितोषिके देण्यात आली होती, त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्येही या योजनेची चर्चा रंगली होती. दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात आलेल्या या योजनेने राज्याच्या दुर्गम भागापर्यंत पोहोच (Eknath Shinde) मिळवली. मात्र, 2025–26 या शैक्षणिक वर्षात या योजनेची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद पेटला आहे.

योजनेलाही यंदा मुहूर्त नाही

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सुरू झालेल्या ‘आनंदाचा शिधा’ या योजनेलाही यंदा मुहूर्त मिळालेला नाही. या दोन्ही योजनांना स्थगिती मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकाळातील उपक्रमांकडे दुर्लक्ष केलं जातंय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राजकीय पार्श्वभूमी

राजकीय तज्ज्ञांच्या मते, या निर्णयांमागे सत्ताधारी पक्षातील अंतर्गत मतभेदही असू शकतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील ‘शीतयुद्धा’चा परिणाम म्हणून काही योजना मागे पडत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महायुती सरकारकडून सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या नव्या योजनेमुळे शाळांसंबंधित योजनांवरील प्राधान्य कमी झाल्याची चर्चा मंत्रालयीन वर्तुळात सुरू आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते, निधी व लक्ष नवीन योजनांकडे वळल्याने शिंदे यांच्या काळातील प्रकल्प तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत.

follow us