आणखी एक दुर्घटना! दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमान अपघात, लॅंडिंगदरम्यान उडाला आगाची भडका

  • Written By: Published:
आणखी एक दुर्घटना! दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमान अपघात, लॅंडिंगदरम्यान उडाला आगाची भडका

Canada Plane Crash: दक्षिण कोरियातील विमान अपघाताची (Plane crash in South Korea) घटना ताजी असताना आता कॅनडातही एक विमान अपघात झाला. हॅलिफॅक्स विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरल्याने विमानाच्या काही भागाला आग लागली. या घटनेनंतर हॅलिफॅक्स विमानतळ (Halifax Airport) परिसरात प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, या विमान दुर्घटनेत अद्याप कोणताही जीवितहानी झालेली नाही.

आणखी एक दुर्घटना! दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमान अपघात, लॅंडिंगदरम्यान उडाला आगाची भडका 

कॅनडामध्ये झालेल्या या विमान अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये लँडिंगच्या वेळी विमानाला आग लागल्याचे दिसते. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान पाल एअरलाइन्सचे आहे. एअर कॅनडाचे फ्लाइट एसी 2259 हे विमान सेंट जॉन्सहून हॅलिफॅक्सला जात होते. मात्र, लॅडिंगदरम्यान या विमानाला अपघात झाला. प्राथमिक अहवालानुसार, विमान धावपट्टीला स्पर्श करत असताना हा अपघात झाला आहे. विमानाचा एक टायर निकामी झाल्याने विमानाचा तोल गेला आणि एक पंखा डांबरी चौकटीला घासला त्यामुळं विमानाच्या काही भागाला आग लागली.

श्यामबाबूंचा डिव्हाईन स्पर्श कधीच विसरू शकत नाही ; सौमित्रांची भावनिक पोस्ट 

प्रवाशाने सांगितली अपघातची घटना…
विमानात बसलेल्या निक्की व्हॅलेंटाईन या प्रवाशाने कॅनडाच्या स्थानिक मीडिया सीबीसी न्यूजला सांगितले की, आमचे विमान सुमारे 20 अंशाच्या कोनात डावीकडे झुकले आणि हे घडतांना मोठा आवाज आला, जणू संपूर्ण विमानच कोसळलंय.. यानंतर काहीच वेळात विमानाच्या डाव्या बाजूला आग लागली आणि खिडक्यांमधून धूर येऊ लागला.

दक्षिण कोरियातही विमान अपघात…
दक्षिण कोरियाच्या विमानतळावर लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवरून घसरले आणि काँक्रीटला धडकले होते. या दुर्घटनेत विमानातील दोघे वगळता सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा देशातील सर्वात भीषण विमान अपघातांपैकी एक आहे. सेऊपासून 290 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुआन शहराच्या विमानतळावर कोसळलेल्या जेऊ एअरच्या विमानतील प्रवाशांसाठी बचाव कार्य सुरू असल्याचे नॅशनल फायर एजन्सीने म्हटलं. हे विमान 181 प्रवाशांसह बँकॉकहून परतत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube