Download App

‘महादेव माझा लहान भाऊ, त्यांना विजयी करा’; PM मोदींचं आवाहन अन् परभणीकरांना दिला गृहपाठ

PM Narendra Modi Speech in Parbhani : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीचे उमेदवार (PM Narendra Modi) महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी आज परभणीत आले होते. त्यांच्या प्रचारानिमित्त आयोजित जाहीर सभेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात महादेव जानकर यांचा माझा लहान भाऊ असा उल्लेख करत त्यांच्या हातात शिट्टी दिली. जानकरांनीही लगेच शिट्टी वाजवली. यानंतर मोदींनी जानकरांना विजयी करण्याचे आवाहन करत परभणीकरांनी तीन कामेही सांगितली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड उपस्थित होते.

मोदी पुढे म्हणाले, महादेव जानकर विजयी होऊन यावेत यासाठी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. ते म्हणजे कितीही उन्हाळा असला तरी जास्तीत जास्त मतदान करावं लागेल. आधी मतदान मग जलपान हे पक्कं करा. दुसरं काम आपल्याला मतदान केंद्र जिंकायचं आहे. प्रत्येक मतदान केंद्र जिंकण्यासाठी प्रत्येकाचं मन तुम्हाला जिंकावं लागेल तुम्ही माझ्यासाठी हे काम करणार ना मग नक्की करा.

‘पावसाच्या अंदाजासारखाच मतरुपाने पाऊस पाडा’ पंजाबराव डख यांची परभणीकरांना साद

आता तिसरं काम माझं काम आहे जानकरांचं नाही करणार का, असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यावर लोकांनी हात वर करून होकार दिला. मग मोदी म्हणाले, प्रत्येक घराघरात जा आणि घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना सांगा आपले मोदी परभणीत आले होते. त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितला आहे. ज्यावेळी प्रत्येक वयस्कर व्यक्तीपर्यंत माझा नमस्कार पोहोचेल तेव्हा ते मला आशीर्वाद देतील. त्यांचा आशीर्वाद हीच माझी ऊर्जा आहे. त्यांचे आशीर्वाद मला देशासाठी दिवसरात्र काम करण्यासाठी ताकद देतात. हे माझं वैयक्तिक काम आहे तेवढं कराच अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीकरांना केली.

मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशात 2014 आधी दहशतवादाच्या मुद्द्यांवर फक्त चर्चा व्हायची. परंतु, नंतर परिस्थिती इतकी बदलली की आता सर्जिकल स्ट्राइकची चर्चा होत आहे. आता बाहेरच्या देशात मोदी घर में घुसके मारता है, अशी भीती आहे. यानंतर मोदींनी राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. इंडिया आघाडीच्या खोट्या प्रचारापासून सावध राहा असेही सांगितले.

‘इंडिया’ आघाडीचे नेते 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडणार; मोदींनी नांदेडमध्ये भरला हुंकार 

follow us