‘इंडिया’ आघाडीचे नेते 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडणार; मोदींनी नांदेडमध्ये भरला हुंकार

‘इंडिया’ आघाडीचे नेते 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडणार; मोदींनी नांदेडमध्ये भरला हुंकार

Lok Sabha Elections PM Modi Nanded Tour : देशात सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Elections ) प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) सध्या राज्यात सभा घेत आहेत. यामध्ये शुक्रवारी ( 19 एप्रिल) राज्यात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता नांदेडसह अन्य मतदारसंघात 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यासाठी आज (20 एप्रिल) मोदींनी परभरणीचे उमेदवार महादेव जानकर आणि नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांसाठी नांदेडमध्ये ( Nanded Tour ) सभा घेतली.

आनंद एल राय यांच्या आत्मपॅम्फलेट आणि झिम्मा 2 सह प्रादेशिक सिनेमांमध्ये पटकावलं अव्वल स्थान

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेससह इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, निवडणुकांपूर्वीच पराभव होईल याची भीती बाळगणाऱ्या विरोधीपक्षाच्या कार्यकर्त्यांना आज न उद्या संधी मिळेल. निराश होऊ नका. असे सांगत मोदी यांनी विरोधकांना आशेचा किरण दाखवला आहे. तसेच त्यांनी सर्वांना रामराम करत मोदींनी नांदेडकरांना 26 एप्रिलची तयारी झाली ना? असा प्रश्न विचारला. तसेच लोकशाही ताकद वाढवण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान कुणालाही करा पण वोटिंग अवश्य करा असे आवाहन मोदींनी मतदारांना केले. वायनाडमध्ये मतदान झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल. असेही मोदी म्हणाले.

व्यवसाय शेती, स्वतः ची कार नाही अन् 24 हजार कॅश; शाहंची संपत्ती पाहून व्हाल आवाक्

हे लोक कितीही दावे करू देत पण सत्य हेच आहे की, काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच पराभव स्वीकारला आहे. त्यामुळेच लोकसभेत सातत्याने विजय मिळवणारे काही नेते यावेळी राज्यसभेच्या मार्गाने प्रवेश करत आहेत. असं म्हणत त्यांनी सोनिया गांधींना टोला लगावला आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या नेत्यांना उमेदवारच मिळत नसल्याची स्थिती असल्याचेही मोदी म्हणाले.

तर मोदी यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना म्हटलं की, ‘इंडिया’ आघाडीचे नेते 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडणार आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे की, काँग्रेसचा कुटुंबच काँग्रेसला मतदान देणार नाही. कारण ज्या ठिकाणी ते राहतात तिथे काँग्रेसचा उमेदवारच नाही. तसेच चार जून नंतर निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीतील नेते 100% एकमेकांचे कपडे फाडताना दिसतील. असं म्हणत मोदी यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube