Bachchu Kadu : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत चालली आहे.
मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर सातत्याने नाराजी व्यक्त करणारे आमदार बच्चू कडू आरपारच्या मूडमध्ये आले आहेत. आज सकाळी 11 वाजता आपण पुढील वाटचालीसंदर्भात भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. आता ते काय निर्णय घेणार, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…
मंत्रीपद मिळण्याची शक्यता असणाऱ्या आमदारांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे फोन गेल्याची चर्चा आहे. कडू यांनीही या चर्चांना दुजोरा दिला. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला फोन आलेला आहे. आज 11 वाजत मंत्रीमंडळात सामील व्हायचे की नाही याबाबत माझी भूमिका मी जाहीर करणार आहे. त्यांनी मला फक्त फोन करून बोलावलं आहे. विस्ताराबाबत काय निर्णय घ्यायचा, याबाबत 11 वाजता मी भूमिका जाहीर करणार आहे. असे कडू म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याच्या मुद्द्यावर कडू म्हणाले, विस्तार का रखडला याची माहिती माझ्याकडे नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जास्त सांगू शकतील. येथून पुढे राजकारण कशासाठी करायचं. कुणासाठी काम केलं पाहिजे, पुढील वाटचाल कशी असेल यासंदर्भात बोलणार आहे.
दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…
या सगळ्या विषयांवर सविस्तर मी कुरळ पूर्णा येथे बोलणार आहे. मी काय भूमिका घेणार ते अकरा वाजता जाहीर करेल. निर्णय धक्का देणारा राहील की?,मला धक्का धक्का देणारा राहील की इतरांना धक्का देणार राहील ते अकरा वाजता कळेल, असा सूचक इशाराही कडू यांनी यावेळी दिला.