Pune Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज (Pune Accident) धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात राज्य सरकार बॅकफूटवर गेलं आहे तर विरोधक तुटून पडले आहेत. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर सुरुवातीपासूनच आक्रमक आहेत. डॉ. तावरेंच्या पाठीशी प्रशासन होतं. ससून रुग्णालयाच्या डीन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं यात सुद्धा शंका आहे. डॉ. अजय तावरेला क्लीनचिट देण्याचा प्रयत्न होतोय असं मला वाटतं. पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी धंगेकर यांनी केली.
धंगेकर यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांन राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने काम करत आहेत असा गंभीर आरोप धंगेकरांनी केला होता. त्यावर मुश्रीफांनीही प्रतिआव्हान देत धंगेकरांनी माफी मागितली नाही बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या आव्हानावर आज धंगेकरांनी पुन्हा मुश्रीफांना डिवचलं आहे. सत्तेसाठी वडिलांसारख्या शरद पवारांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफांनी धमकी देऊ नये, असे प्रत्युत्तर रवींद्र धंगेकर यांनी दिले.
देशात 300 राज्यात 40.. काँग्रेस नेत्यानं सांगितलं ‘मविआ’ विजयाचं गणित
पुण्यात अनेक तरुण, नोकर वर्ग येत असतो. पुण्यात आता पब संस्कृती आली आहे. उडता पंजाब सारखं उडतं पुणे म्हणण्याची वेळ आता आली आहे. अपघात प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी तपासाची दिशा योग्य पद्धतीने नेली आहे मात्र सरकारचा दबाव येऊ शकतो. ससून रुग्णालयावर आम्ही जे आरोप केले त्यामुळे मुश्रीफांना राग आला आहे. मी त्यांच्या पाया पडून माफी मागतो मात्र पब संस्कृती संपली पाहिजे. मला कोणीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी मी घाबरणार नाही. माझ्यावर कारवाई केली तर प्रत्येक पुणेकर रस्त्यावर येईल. भाजप मला वैयक्तिक जीवनात त्रास देत आहे असा आरोप धंगेकरांनी केला.
ससून रुग्णालयाच्या डीनना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे यात सुद्धा शंका आहे. अजय तावरेला क्लीनचिट देण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं. माझ्यावर हक्क भंग करणाऱ्याच्या मतदारसंघात जाऊन मी तिथे स्पष्टीकरण द्यायला तयार आहे असेही धंगेकर म्हणाले. पुण्यात बिल्डर लोकांचं राज सुरू आहे. पोलीस सुपाऱ्या घेऊन कामं करतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हा भ्रष्टाचारी माणूस आहे. राज्य सरकारच्या सगळ्याच विभागाच भ्रष्टाचार होत आहे. महसूल असो की गृहखातं सगळेच महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत. पुणेकर नागरिक गप्प बसणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर दोन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं असे धंगेकर म्हणाले.
पुणे अपघात! डॉ. तावरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकलं नाही