पुणे अपघात! डॉ. तावरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकलं नाही

पुणे अपघात! डॉ. तावरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकलं नाही

Pune Accident News: पुणे अपघात प्रकरण एका सिनेमापेक्षा काही कमी राहिलेलं नाही. (Sasoon) अनेक धागेदोरे आणि खळबळजनक खुलासे यामध्ये रोज होत आहेत. (Pune Accident) आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रताप केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल नामदेव घटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. (Dr. Tavre) दरम्यान, ब्लड सॅम्पलबाबत नवा खुलासा समोर आला आहे.

बदलेले ब्लड सॅम्पल आरोपी मुलाच्या आईचं? ढसाढसा रडणाऱ्या शिवानी अग्रवाल बेपत्ता

रक्ताचं सॅम्पल घेतल्यानंतर ते डॉ. श्रीहरी हाळनोर याने कचरापेटीत न टाकता एका व्यक्तीकडे दिलं व त्याऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले अशी माहिती डॉ. तावरेंनी दिली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ताब्यात असलेली संबंधित व्यक्ती आणि महिला कोण हा प्रश्न निर्माण झाला असून त्याबाबतचा शोध सुरू झाला आहे अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितली.

दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ज्या ठिकाणी घेतले होते त्या ठिकणी पोलिसांनी पंचनामा केला आहे. त्यावेळी रक्ताचं सॅम्पल घेतलं तेथे ‘सीसीटीव्ही’च नसल्याची माहिती समोर आली आहे. आसपासच्या ‘सीसीटीव्ही’त हाळनोर आणि घटकांबळे यांच्यासह काही साक्षीदार दिसून आले आहेत. या प्रक्रियेदरम्यान डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि घटकांबळे यांच्यात व्हॉट्सअॅप व समाजमाध्यमातून संवाद झाला असून, इतर संशयितांसोबत आर्थिक देवाणघेवाणही झाल्याचं उघड झालं असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलं.

पुणे अपघात प्रकरणात अंधारेंचा मोठा दावा; म्हणाल्या, डॉ. तावरेंना सहाव्या मजल्याचं संरक्षण

यामध्ये आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. हाळनोर याने घेतलेले अडीच लाख रुपये व घटकांबळे याने घेतलेले पन्नास हजार रुपये, तसंच रुग्णालयातील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण पोलिसांनी जप्त केलं आहे. दोन्ही डॉक्टर, शिपाई व विशाल अगरवाल यांच्यामध्ये दूरध्वनीवरून बोलणं झाले असून, त्यांची एकत्रित चौकशी होणार आहे. तसंच आरोपींच्या घरांची झडती घ्यायची आहे, असे न्यायालयास सांगण्यात आलं आहे.

अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्याचा हा प्रताप केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल नामदेव घटकांबळे यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, न्यायालयाने ५ जूनपर्यंत कोठडीत वाढ केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज