Download App

“लोकसभेला साथ दिली, पुढे तीन महिन्यांनीही द्या”, शरद पवारांची विधानसभेसाठी फिल्डिंग

लोकसभा निवडणुकीत साथ दिली तशीच पुढे तीन महिन्यांनीही साथ द्या, आवाहन शरद पवार यांनी बारामती आणि पुरंदर तालुकावासियांना केले.

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यांच्या या यशात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाटा मोठा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता शरद पवारांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाण्याअभावी दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांनी आज पुरंदर आणि बारामती तालुक्यातील  काही गावांना भेटी दिल्या. येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच लोकसभा निवडणुकीत साथ दिली तशीच पुढे तीन महिन्यांनीही साथ द्या, आवाहन शरद पवारांनी केले.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? ‘मी असं बोललोच नाही’ शरद पवारांचा घुमजाव..

शरद पवार यांनी आज पुरंदर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावळी त्यांनी शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याचाही सल्ला दिला. आता फक्त शेती करून चालणार नाही. या शेतीला काहीतरी जोड दिली पाहिजे. शेती आणि जोडधंदा यासाठी दीर्घकालीन उपाययोजना काय करता येतील याची माहिती घेण्यासाठी मी आलो आहे. आगामी काळात या क्षेत्रात सुधारणा होणे गरजेचे आहे यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शरद पवार म्हणाले.

सध्याचं वातावरण बदललं आहे. वातावरण समाधानकारक नाही. लोकसभा निवडणुकीत तुम्हा काही कमतरता पडू दिली नाही. आता अशीच साथ पुढे तीन महिन्यांनी द्या.  सध्या पावसाची कमतरता आहे मात्र तुम्ही मतांची कमतरता पडू दिली नाही. आता शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट  केले.

“बारामतीच्या निकालाचं मलाही आश्चर्य”, अजितदादांनी सांगितलं महायुतीच्या पराभवाचं कारण

दरम्यान, महाराष्ट्रासह देशाचं लक्ष बारामती मतदारसंघावर होतं. कारण येथे पवार कुटुंबातील सदस्य रिंगणात होते. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या. त्यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. बारामतीत जंगी सभा झाली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हजर होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सभा घेतली. पण, या कशाचाच उपयोग झाला नाही. शरद पवारांचंच नाव येथे चाललं. सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा खासदार म्हणून  निवडून आल्या.

follow us