Download App

राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस; बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा…

Maharashtra Rain Update : राज्यात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात आता काही दिवसांपासून शांत असलेला वरुणराजा आता पुन्हा एकदा बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(maharashtra Rain Update IMD heavy Rain in Four day low pressure belt bay of bengal)

‘मंत्रीपद नसल्याने हा माणूस बिथरला’; ठाकरे गटाचा नेता शिरसाटांवर भडकला

बांगलादेशच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून आज संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पुर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 24 तासांत पश्चिम बंगालमधील गंगा नदीचे खोरे ओलांडण्याची शक्यता आहे. या घडामोडींचा हवामानावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला. असं असलं तरीदेखील काही भागांमध्ये पावसाची बळीराजा अद्यापही वाट पाहताना दिसत आहे. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीकविम्याच्या अर्जाबाबत मंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा…

भारतीय हवामान विभागाकडून पुढील दोन महिन्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. या दोन महिन्यांमध्ये देशात मान्सून साधारण राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रामध्येही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये अलर्ट दिला आहे.

उद्या (दि. 2) मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

3 ऑगस्टला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 4 ऑगस्टला मुंबई, पालघर, रायगड, पुणे, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Tags

follow us