Download App

Landslide : इर्शाळवाडीनंतर ‘या’ ठिकाणी कोसळली दरड; लोक भयभीत, वाहतूक ठप्प!

Bhuibawada Ghat : मुसळधार पावसामुळे कोकणात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. इर्शाळवाडीतील मन हेलावणारी घटना ताजी असतानाच आता वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

या तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच पूलही पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यात जुलै महिन्यातच 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात दरड कोसळली. दरडीचा बराचसा भाग नाल्यात कोसळला असला तरी काही मोठे दगड रस्त्यावर पडले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Irshalwadi landslide : झोपड्या तोडणारे वनविभागाच आता आरोपाच्या पिंजऱ्यात

दरड कोसळल्यानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ कामाला सुरुवात करत रस्त्यात पडलेले दगड हटवले. अर्ध्या तासात रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. घाट परिसरात लहान मोठे दगड कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. तळेरे-कोल्हापूर या मार्गावरील करूळ घाटातही दगड रस्त्याच्या कडेला कोसळले होते. यामुळे वाहतुकीवर काही परिणाम झाला नाही.

इर्शाळवाडीत मुख्यमंत्री शिंदे मुक्कामी

दरम्यान, काल सकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री शिंदे इर्शाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते. त्यानंतर दीड तास पायपीट करत इर्शाळवाडीत दु्र्घटनाग्रस्त गावाला भेट दिली. मुख्यमंत्री स्वतः बचावकार्यात सहभागी झाले. याच काळात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे तेथील कामकाजाची जबाबदारी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिली आहे.

आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर दुर्घटना टाळता आली असती; अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

रायगडात आजही धो धो बरसणार

कोकण, विदर्भासह काही जिल्ह्यांत तुफान पाऊस सुरू आहे. मुंबई शेजारच्या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना हवामान खात्याने आज (21 जुलै) पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता ठाणे, रायगड, पालघर येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

Tags

follow us