आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर दुर्घटना टाळता आली असती; अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर दुर्घटना टाळता आली असती; अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Amit Thackeray : रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्याच्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्यामध्ये अद्यापही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता या घटनेवर आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा हल्लाबोल मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर केला आहे. ते जळगाव दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.(Amit Thackeray Criticize Shinde fadnavis Government Irshalwadi Accident mns)

Irshalwadi Landslide : ग्रामस्थांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी पायथ्याशी 50 कंटेनर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

इर्शाळवाडी गावातील दुर्घटनेतून 75 जणांना बाहेर काढलं असलं तरी देखील त्यांच्याकडे आता काय उरलं आहे? असा सवालही अमित ठाकरेंनी केला आहे. त्याचवेळी ठाकरे म्हणाले की, राज ठाकरेंनी यापूर्वीच सांगितलं होतं की, अशी घटना घडू शकते, त्यांना याचा काय अंदाज आला होता माहित नाही, पण त्यांनी आधीच सावध केलं होतं. मात्र हे सर्वजण आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर त्यांच्याकडून वेळीच लक्ष घातलं गेलं असतं. मात्र सरकारकडून याकडे दुर्लक्ष केलं जातं हे दुर्देवी आहे.

मृतांची संख्या वाढली! 48 कुटुंबं जमीनदोस्त, 100 जण मातीच्या ढिगाऱ्याखालीच, CM शिंदेंनी ठोकला तळ

सरकार दुर्घटना होण्याची वाट पाहात असतं का? हे पत्रकारांनी सरकारलाच विचारलं पाहिजे असंही यावेळी अमित ठाकरे म्हणाले. ठाकरेंना पत्रकारांनी विचारले की, महाराष्ट्रात सध्या चाललंय काय? मतदारराजा हा अत्यंत संभ्रमात आहे, अशी परिस्थिती महराष्ट्राने पाहिला नाही, त्यावर अमित ठाकरे म्हणाले की, मनसेकडून संतापाची एक सही अशी मोहीम राबवण्यात आली, त्यामधून दिसून आलं असेल की मतदार किती संतापला आहे. येत्या निवडणुकीत याचं उत्तर नक्की मिळेल असंही अमित ठाकरे यांनी सांगितले.

या दुर्घटनेतून 80 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यानंतर या दुर्घटना स्थळाला मंत्र्यांसह मुख्यमंत्री शिंदेंनी भेट दिली. त्यांनी या ग्रामस्थांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करणार तसेच त्यांच्यासाठी पायथ्याशी तात्पुरती 50 कंटेनरची व्यवस्था करणार असल्याचं अश्वासन दिलं आहे.

काही ग्रामस्थ भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे. या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube