मृतांची संख्या वाढली! 48 कुटुंबं जमीनदोस्त, 100 जण मातीच्या ढिगाऱ्याखालीच, CM शिंदेंनी ठोकला तळ

मृतांची संख्या वाढली! 48 कुटुंबं जमीनदोस्त, 100 जण मातीच्या ढिगाऱ्याखालीच, CM शिंदेंनी ठोकला तळ

Irshalwadi landslide : गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळं कोकणात हाहाकार उडाला आहे. काल रात्री 11 वाजता इर्शाळवाडीत (Irshalwadi) दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. दरड कोसळल्याने आतापर्यंत सोळा जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झालेत. सुमारे 100 लोक अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेमुळं राज्यभरात हळहळ व्यक्त होतेय. मुसळधार पावसामुळे काही वेळापूर्वी शोधमोहीम थांबवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वत: बचाव कार्यात भाग घेतला होता. आताही मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी मुक्कामी थांबले आहेत. (Irshalwadi landslide Death toll rises in accidents Chief Minister eknath shinde stay)

https://www.youtube.com/watch?v=YvWYxKSfwwg

रायगड जिल्ह्यातील खालपूर तालुक्यातील इर्शाळवाडी गाव जमीनदोस्त झालं. निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कडेला वसलेले हे गाव रात्री गाढ झोपे असतांनाच या गावातील अनेकांवर काळाने घाला घातला. काल मध्यरात्री दरड कोसळल्याने 45 घरांचे हे गाव गाढलं गेलं. मदत आणि बचावकार्य अजूनही सुरूच आहे. दुपारपर्यंत मृतांची संख्या 12 होती. आता ही संख्या 16 वर पोहोचली आहे. बचाव पथकाने 93 जणांना सुखरूप बाहेर काढले असून सुमारे 100 लोक अद्याप बेपत्ता आहेत. काल रात्री अंधार आणि पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र, आज दिवसभर बचावकार्य सुरू होतं.

भारत-वेस्ट इंडिजच्या 100व्या कसोटी सामन्यात ब्रायन लाराने रोहित शर्माला दिले खास गिफ्ट 

सकाळपासून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि समाजसेवी संस्थांनी मोठं काम करून अनेकांचे प्राण वाचवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आज सकाळी 7.30 वाजता इर्शालवाडीच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर त्यांनी दीड तास चालत इर्शाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त गावाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बचाव कार्यात सहभाग घेतला. त्याचवेळी अधिवेशन सुरू असल्याने त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर कामाची जबाबदारी टाकून घटनास्थळीच मुक्कामी थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, दरड कोसळण्याची ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. या गावात 48 कुटुंबांसह 228 लोक राहतात आणि अजूनही सुमारे 100 लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे सांगण्यात येत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube