Download App

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर, नवी मुंबई ठरलं देशातील तिसरे स्वच्छ शहर

  • Written By: Last Updated:

मुंबई: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार (Clean Survey Award) 2023 मध्ये महाराष्ट्राने (Maharashtra) देशात प्रथम क्रमांक पटकावला असून गुरुवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच. गोविंदराज यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्री सिंग पुरी यावेळी उपस्थित होते.

दुतोंडी! एकीकडे भाजपवर टीका करायची अन् दुसरीकडे भाजपशी जवळीक…; शिंदे गटाचा दावा 

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 चे निकाल आज जाहीर करण्यात आले. इतर राज्यांना मागे टाकून महाराष्ट्राने पहिल्यांदाचा प्रथम पुरस्कार पटकावला. गेल्या वर्षी मध्य प्रदेश राज्याला हा पुरस्कार मिळाला होता. इंदूर आणि सुरत शहरांनी संयुक्तपणे देशात प्रथम क्रमांक पटकावला असून नवी मुंबई हे देशातील तिसरे स्वच्छ शहर ठरले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Pune : फडणवीसांकडून आमदार शिरोळेंवर मोठी जबाबदारी; निवडणुकांच्या तोंडावर PMRDA वर नियुक्ती

राष्ट्रीय स्तरावरील नागरी स्थानिक स्वराज्य पुरस्कारांपैकी तीन पुरस्कार राज्यातील नवी मुंबई महानगरपालिका, सासवड नगरपालिका आणि लोणावळा नगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईने सात स्टार रेटिंगसह तिसरे स्थान कायम राखले आहे. तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले सासवड हे देशातील पहिले तर लोणावळा शहर देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या संस्थांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. याशिवाय पुणे महानगरपालिका (स्वच्छतेत दहाव्या) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (फाइव्ह स्टार रेटिंग आणि वॉटरप्लस रेटिंगसह स्वच्छतेमध्ये तेराव्या क्रमांकावर), गडहिंग्लज (25 ते 50 हजार लोकसंख्येचे सर्वात स्वच्छ शहर – पश्चिम विभाग), कराड ( 50 हजार ते एक लाख लोकसंख्येचं सर्वात स्वच्छ शहर – पश्चिम विभाग), पाचगणी (15 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेले स्वच्छ शहर – पश्चिम विभाग देशात 28 वा क्रमांक) यांनाही राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पहिल्या 10 पैकी आठ शहरे महाराष्ट्रातील असून त्यात सासवड, लोणावळा, गडहिंग्लज, कराड, पाचगणी, विटा, देवळाली, सिल्लोड यांचा समावेश आहे.

गतवर्षी राज्यातील केवळ नवी मुंबई या एकाच शहराला सात स्टार दर्जा मिळाला होता. तो दर्जा नवी मुंबईने यंदाही कायम ठेवला आहे. देशातील केवळ तीन शहरांना सेव्हन स्टार दर्जा मिळाला आहे. यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांना फाईव्ह स्टार दर्जा मिळाला आहे. तर 28 शहरांना थ्री स्टार दर्जा मिळाला असून या गटात महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकावर आहे. याशिवाय 81 शहरांना वन स्टार दर्जा मिळाला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील फक्त चार शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला होता. त्यात वाढ होऊन स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्रातील 21 शहरांनी वॉटर प्लस दर्जा प्राप्त केला आहे. महाराष्ट्रात आता देशातील सर्वाधिक जलसमृद्ध शहरे आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये 200 शहरांना ODF प्लस दर्जा देण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये 264 शहरांनी ODF प्लस दर्जा प्राप्त केला आहे.

follow us