Maharashtra Government Ladaki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण योजना राबवून सत्तेत आलेल्या महायुती सरकावर (Mahayuti Government) विरोधकांकडून वेळोवेळी प्रश्चचिन्ह उपस्थित केले जातात. एवढेच नव्हे तर, लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या रक्कमेसाठी दुसऱ्या विभागांचा निधी वळवण्यात येत असल्याची ओरडही काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता लोकप्रिय ठरलेली ही योजना फडणवीस सरकारसाठी (Devendra Fadnavis) त्रासदायक ठरू लागल्याचे चित्र असून, वर्षभरात लाडक्या बहिणींसाठी तिजोरीवर पडलेल्या आर्थिक ताणाची आकडेवारी माहिती अधिकारातून समोर आली आहे.
लाडकी बहीण योजना : सरकार ॲक्शन मोडमध्ये ‘या’ लोकांकडून वसूल करणार 16 हजार 500 रुपये
लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारने किती कोटी खर्च केले?
एका माहिती अधिकारात समोर आलेल्या आकडेवारीनुसार वर्षभरात राज्यसरकारचे 43 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) सुरू करण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान या योजनेचा सरकारला मोठा फायदादेखील झाला. त्यावेळी सरकारने ही योजना चालवण्यासाठी 36 हजार कोटींचा निधी दिला होता. मात्र, आता एका वर्षानंतर, योजनेवरील खर्च वाटप केलेल्या निधीपेक्षा जास्त असल्याचे उघड झाले आहे.
जितेंद्र घाडगे यांनी माहितीसाठी आरटीआय अर्ज दाखल केला होता. त्यानुसार लाडकी बहीण योजनेवर एका वर्षात 43,045 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे काही बचत झाली असली तरी, हा खर्च भविष्यासाठी राखून ठेवलेल्या 36 हजार कोटींच्या निधीपेक्षा खूपच जास्त आहे. Maharashtra Government Ladaki Bahin Yojana
महापालिका निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
सरकारी तिजोरीवरील ताण वाढणार
लाडकी बहीण योजनेअंतर्गत, जुलै 2024 ते जून 2025 पर्यंत 43,045.06 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.सरकारने 2026-26 या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी 36 हजार कोटींचा निधी दिला आहे. पहिल्या वर्षी सरासरी मासिक खर्च 3,587 कोटी होता. त्यामुळे, निकषांनुसार लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी झाली नाही तर, यामुळे सरकारी तिजोरीवर ताण वाढण्याची शक्यता आहे.
लाभार्थ्यांची संख्या कधी कमी झाली आणि कधी वाढली?
माहिती अधिकारानुसार, योजना सुरू झाल्यापासून 43,045.06 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. जुलैपासून अर्ज दाखल करताना लाभार्थ्यांची संख्या वाढली आणि एप्रिल 2025 पर्यंत सर्वाधिक लाभार्थी 2,47,99,797 (2.47 कोटी) महिला होत्या. मात्र, जून 2025 पर्यंत लाभार्थ्यांची संख्या आणि वितरित केलेल्या रकमेत सुमारे नऊ टक्क्यांनी घट झाली. निकषांवर आधारित सुमारे 77,980 महिलांना वगळण्यात आले, ज्यामुळे राज्याचे सुमारे 340.42 कोटी रुपयांची बचत झाली.
लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सर्वकाही
सरकारसमोर उभं राहू शकत आव्हान
सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींचा निधी दिला आहे. परंतु, पहिल्या वर्षी सरासरी मासिक खर्च 3,587 कोटी होता. त्यामुळे, जर निकषांनुसार लाडली बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी झाली नाही, तर सरकारसमोर योजनेच्या निधीचे वाटप करताना अतिरिक्त दबाव येऊन एक मोठे आव्हान उभं राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
