Download App

राऊतांचा गौप्यस्फोट ! शरद पवार म्हणाले भाजपात जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव

Sanjay Raut : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याचा वावड्या सतत उठत आहेत. यावर अजित पवार यांनी अजून तरी कोणतेही ठाम उत्तर दिले नसले तरी राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या संदर्भात अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने महाविकास आघाडीत सारेच काही आलबेल नसल्याचेच अधोरेखित होत आहे.

मागील आठवड्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभयतांत बराच चर्चा झाली. यानंतर अनेक तर्क लावले जाऊ लागले. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती नेत्यांनी याआधी दिली होती. मात्र, आज संजय राऊत यांनी जी माहिती दिली त्यावरून पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

‘त्या’ घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी! न्यायालय योग्य तो…

राऊत आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की मी आणि उद्धव ठाकरे मागील आठवड्यात शरद पवार यांना भेटलो होता. आमची प्रदीर्घ चर्चा झाली. ही चर्चा अर्थातच महाविकास आघाडीच्या संदर्भात तसेच राज्यातील राजकारणावर होती. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सरकारकडून होत आहे. या यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षाचे आमदार फोडायचे. शिवसेनेबाबतही तेच घडलं आणि आमदार फोडले.

आदित्य ठाकरे यांनी देखील सांगितलं की कसे प्रमुख नेते ईडीच्या भीतीने रडत होते. तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबतॉ वापरलं जात आहे. हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे, यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे राऊत म्हणाले.

शरद पवार यांनी सांगितले की काहीही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार नाही. कितीही दबाव आणला जात असला तरी आम्ही तो निर्णय घेणार नाही. यातच काही आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांवर दबाव आहे. तपास यंत्रणांकडून मुलांना बोलावलं जात आहे, असे आमदार दबावात आहेत, तो निर्णय त्यांचा असेल, पक्षाचा नाही असे पवार म्हणाल्याचे राऊत यांनी सांगितले.

धर्माधिकारी महाराष्ट्रभूषण पुरस्कार वादात पडणार नाही! पण…

शरद पवार उद्धव ठाकरे मागील आठवड्यात शरद पवारांना भेटलो. त्यावरील महाविकास आघाडी आणि राज्यातील राजकारणावर चर्चा झाली. केंद्रीय तपास यंत्रणांचाा दुरुपयोग सत्तेचा दबाव टाकून करायचा. विरोधी पक्षाचे आमदार फोडायचे काम सुरू आहे. शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं. आमदार फोडले आदित्य ठाकरे यांनी यावर खुलासा केला कसे नेते रडत होते.आम्हाला तुरुंगात जायचं नाही तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत वापरले जात आहे.

पवार कुटुंबियांना नोटीसा 

पवार कुटुंबियांना अशा पद्धतीच्या नोटीस आल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या घरावर धाडी टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला आहे. आम्ही त्यातून भरडून निघालो मात्र आम्ही झुकणार नाही. शरद पवार यांनी ते सांगितलं की आम्ही झुकणार नाही की पक्ष म्हणून त्यात जाणार नाही.

Tags

follow us