धर्माधिकारी महाराष्ट्रभूषण पुरस्कार वादात पडणार नाही! पण…

धर्माधिकारी महाराष्ट्रभूषण पुरस्कार वादात पडणार नाही! पण…

Chhatrapati Sambhajiraje : ज्येष्ठ निरुपणकार अप्पापाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार वादात मी पडणार नाही. पण आज अनेक जण खऱ्या अर्थान महाराष्ट्रसाठी आयुष्य घालवत आहे. त्यांनाही पुरस्कार दिला पाहिजे. हा पुरस्कार देण्यासाठी एक समिती गठीत करून अभ्यास करून महाराष्ट्रभूषण सारखे पुरस्कार देण्यात यावे, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आज राज्यात अनेक लोकं असे आहेत की त्यांचे काम खूप मोठे आहे. पण, त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला जात नाही. त्यांनाही पुरस्कार दिला पाहिजे असे मला वाटते. खरंतर महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यासाठी एक समिती स्थापन करायला हवी. या समितीने अभ्यास करुन महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणाला द्यायचा याची शिफारस करायला हवी.

‘एकाच घरात दोनदा महाराष्ट्र भूषण’; अप्पासाहेब म्हणाले, हे तर सरकारने.. – Letsupp

आमचा एकच इव्हेंट झाला आहे. बाकी काही नाही. मला महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेविषयी काही देणंघेणं नाही. तुम्ही मला माझ्याविषयी, स्वराज्य पक्षा विषयी विचारा विचारा. मला वज्रमूठ वगैरे काही घेणं देणं नाही. मी काही महाविकास आघाडीचा प्रवक्ता नाही, असे छत्रपती संभाजीराजे  यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले की, परत-परत गोष्ठी घडत असतील तर शेतकऱ्यांसाठी लॉंग टाइम पॉलिसी करायला हवी. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जगदंबा तलवार आणण्यासाठी पुढाकार घेतला तर चांगली गोष्ट आहे.

परत सत्तासंघर्ष होणार असेल म्हणून मी स्वराज संघटना काढली. जे झालं महाराष्ट्रात सत्तासंघर्ष अगोदर झाला. मला त्या राज्यसभा वेळी खोटं बोललं गेलं. कधी-कधी अस वाटत की ते योग्य झालं का?, अशी खंत देखील छत्रपती संभाजीराजे यांनी बोलून दाखवली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube