‘एकाच घरात दोनदा महाराष्ट्र भूषण’; अप्पासाहेब म्हणाले, हे तर सरकारने..

‘एकाच घरात दोनदा महाराष्ट्र भूषण’; अप्पासाहेब म्हणाले, हे तर सरकारने..

Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपण हे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत असेच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘देशाचे गृहखाते आणि सहकार खाते सांभळताना इतके काम असूनही ते आपल्या सर्वांसाठी येथे आले. हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे. हा पुरस्कार मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन मला हा पुरस्कार दिला गेला. कार्य श्रेष्ठ आहे. कार्याचा तो सन्मान आहे. या पुरस्काराचे श्रेय सगळ्यांचे आहे. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणं हे राज्यात कुठेही घडलेले नाही. हे राज्य सरकारने केलेलं एक महान कौतुक आहे’, अशा शब्दांत अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्काराबद्दल राज्य सरकारचे आभार मानले.

आप्पासाहेब धर्माधिकारी जगातलं आठवं आश्चर्य, देवेंद्र फडणवीसांकडून गौरवोद्गार

ते म्हणाले, हा पुरस्कार नाना आणि आपल्या सगळ्यांना समर्पित आहे. आज समाजाचे, देशाचे काही ऋण आपल्यावर आहेत. ते फेडण्यासाठी आपण काय केलं, आपण त्यांची काय सेवा केली, हे महत्वाचे आहे. समाजाची सेवा करण्यासाठी काय करावं लागतं, हेच आम्ही सांगत असतो. प्रत्येकाने अखंड सेवा करायला पाहिजे. नुसते बोलून काहीच होत नाही.

आप्पासाहेब धर्माधिकारी जगातलं आठवं आश्चर्य, देवेंद्र फडणवीसांकडून गौरवोद्गार

पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड – शहा 

‘महाराष्ट्रात 1995 मध्ये ज्यावेळी भाजप शिवसेना युतीचे सरकार होते तेव्हापासून महाराष्ट्र भूषण पुरस्काराला सुरुवात झाली. त्यानंतर सरकारने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेकांना या पुरस्काराने सन्मानित केले. पुरस्कारांच्या या यादीत नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव जोडले गेले म्हणजे पहिल्यांदाच एकाच घरात दोन महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले गेले. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य खूप मोठे आहे. सामाजिक चेतनेला पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्र सरकारने पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीचीच निवड केली आहे’, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube