आप्पासाहेब धर्माधिकारी जगातलं आठवं आश्चर्य, देवेंद्र फडणवीसांकडून गौरवोद्गार
Maharshtra Bhushan Appasaheb Dharmadhikari : आप्पासाहेब धर्माधिकारी हे जगातलं आठवं आश्चर्य, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आजच्या पुरस्कार सोहळ्यात गौरव केला आहे. आज नवी मुंबईत केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या हस्ते निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारच्यावतीने देण्यात आला. यावेळी फडणवीस बोलत होते.
बिहारमध्ये विषारी दारुचा पुन्हा कहर! मोतिहारीमध्ये 14 जणांचा मृत्यू
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, जगात सात आश्चर्य आहेत. जगातलं आठवं आश्चर्य आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विचारांची श्रीमंती दुसरी कोणती असूच शकत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
कर्नाटकात भाजपचे आणखी बिनसले, माजी मुख्यमंत्र्यांने दिला अल्टिमेटम
आप्पासाहेबांनी निरुपणाच्या माध्यमातून अनेक कार्य केले आहेत. मन स्वच्छ करण्याचं काम धर्माधिकारी यांनी केलंय. तसेच
माणसाची श्रीमंती संस्कारातून दिसते. आज नानासाहेब धर्माधिकारींच्या जन्मशताब्दी वर्षी अप्पासाहेबांना पुरस्कार दिला जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Sujay Vikhe : पोलीस प्रशासन कमी पडल्याने अहमदनगरमध्ये गुन्हेगारी वाढली
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, निरुपणात मन स्वच्छ करण्याचं रसायन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने धर्माधिकारी नामाभिमुख लागल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तेव्हापासूनच हे धर्माचं कार्य धर्माधिकारी यांच्या माध्यमातून होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
अंधेरी पोलिसांच्या नावे इंजिनिअर तरुणीकडून उकळले 25 लाख, पुण्यातील प्रकार…
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांचा गौरव केला आहे. ते म्हणाले अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, जलव्यवस्थापन, आरोग्य जनजागृती, स्वच्छतेचं यासोबत अनेक कार्य केलं आहे. विशेषत: त्यांनी भारत, अमेरिका, सिंगापूर कतारमध्ये रक्तदान शिबिरे घेतल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
बिग बॉस फेम प्रियांका चौधरीचा ग्लॅमर्स अंदाज
दरम्यान, यावेळी कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह शिंदे गट आणि भाजपचे अनेक मंत्री उपस्थित होते.