Sujay Vikhe : पोलीस प्रशासन कमी पडल्याने अहमदनगरमध्ये गुन्हेगारी वाढली

Sujay Vikhe : पोलीस प्रशासन कमी पडल्याने अहमदनगरमध्ये गुन्हेगारी वाढली

Crime increased in the city due to lack of police administration: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा (law and order) प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अहमदनगरमध्ये काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी दोन व्यापाऱ्यांवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे दोघेही व्यापारी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता भाजपचे नेते आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस प्रशासन (Police Administration) कमी पडल्याने अहमनगरमध्ये गुन्हेगारी वाढली असल्याचं विखे यांनी सांगिलते आहे.

यावेळी बोलतांना विखे यांनी सांगितले की, काल अहमदनगरमध्ये व्यापाऱ्यांवर जो हल्ला झाला आहे, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला असं वाटतं की, पोलीस प्रशासन काम करण्यामध्ये कुठंतरी कमी पडत आहे. त्यामुळं अहमनगरमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. पालकमंत्र्यांनी कालच्या हल्ल्यासंदर्भात गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळं नगरमध्ये जे काही गुन्हगारीचं चित्र निर्माण झालं आहे. अतिक्रमण धारक आहेत, या सगळ्यांवर आता कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. येत्या पुढच्या 10 दिवसांत या कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. उपमुख्यमंत्र्याना देखील पालकमंत्र्यांनी याबाबत सांगितले आहे, असे सुजय विखे यांनी सांगितले आहे.

Gautami Patil म्हणाली मला लग्न करायचंय; पठ्ठ्याने थेट पत्रच धाडलं…

काल शहरातील कापड बाजार परिसरात दीपन नवलानी आणि प्राणिल बोगावत या दोन व्यापाऱ्यांवर दिवसाढवळ्या गंभीर प्राणघातक हल्ला झाला. या हल्यात हल्लेखोरांनी व्यापाऱ्यांवर चाकून सपासप वार केले. त्यावेळी प्राणिल बोगावत हे हा वाद मिटवण्यासाठी मध्ये आले. त्यामुळं ते देखील या हल्ल्यात जखमी झाले. या हल्लात नवलानी यांच्या पोटावर सपासप वार करण्यात आलं आहे. सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान, ही घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ निर्माण झाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, हा हल्ला कुणी केला आणि हा हल्ला करण्यामागे नेमका काय कारण, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, पोलीस हल्लेखोरांचा तपास घेत आहेत. जखमी व्यापाऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे व्यापारी वर्गात संतापाची भावना आहे. दरम्यान, आता खासदार सुजय विखे यांनी पुढच्या दहा दिवसांत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube