अंधेरी पोलिसांच्या नावे इंजिनिअर तरुणीकडून उकळले 25 लाख, पुण्यातील प्रकार…

अंधेरी पोलिसांच्या नावे इंजिनिअर तरुणीकडून उकळले 25 लाख, पुण्यातील प्रकार…

Pune Cyber Crime : पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामध्ये खून, दरोडे, कोयता गॅंगनंतर आता सायबर गुन्ह्यांत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक फसवणुकीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये विशेष म्हणजे शिक्षित लोकंच जास्त बळी पडत असल्याचे निदर्शनात येत आहे. असाच एक प्रकार पुण्यात एका इंजिनिअर तरुणीसोबत घडला आहे. अंधेरी पोलिसातून बोलत असल्याचे सांगून तरुणीकडून तब्बल 25 लाख उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तुमच्या नावाने एक पार्सल असून, ते मुंबईहून तैवान येथे पाठविले जाणार आहे. त्यामध्ये 140 ग्रॅम एमडी नावाचा अमली पदार्थ सापडला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये तुमचे नाव आहे. आम्ही अंधेरी पोलिस ठाण्यातून बोलत आहोत, असे सांगून सायबर गुन्हेगारांनी तरुणीला 25 लाख 61 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

दरम्यान, याप्रकरणी 29 वर्षीय इंजिनिअर तरुणीने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर अपर्णा क्रिष्णा अय्यर, अजय कुमार बन्सल, भानसिंग राजपूत, पोलिस असल्याची बतावणी करणारे आणि बँक खातेधारक यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 एप्रिल रोजी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, फिर्यादी तरुणी ही आयटी इंजिनिअर आहे. ती पुण्यातील एका मोठ्या खासगी कंपनीत नोकरी करत असून कोथरूड परिसरात वास्तव्यास आहे. या तरुणीला एक कॉल आला. या फोन कॉलवर आम्ही अंधेरी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याची बतावणी करण्यात आली. तुमच्या नावाने एक पार्सल असून, ते मुंबईहून तैवान येथे पाठविले जाणार आहे. त्यामध्ये 140 ग्रॅम एमडी नावाचा अमली पदार्थ सापडला असून काही पासपोर्ट आहेत. त्यामध्ये तुमचे नाव असल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सायबर चोरट्यांनी तरुणीला सांगितले. मात्र, तरुणीने आपले असे कोणतेच पार्सल नसल्याचं सांगितले.

शिंदेंच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; निनावी पत्राने एकच खळबळ

तरुणीच्या उत्तरानंतर सायबर चोरट्यांनी लगेचच तिच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक सांगितले. यामुळे हे ऐकून तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली. याचाच फायदा चोरट्यांनी घेत आपण पोलीस असल्याची बतावणी करण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर ऑनलाईन जबाब नोंदविण्याचा बहाण्याने तरुणीचे बँक डीटेल्स घेतले आणि इथेच ती इंजिनिअर तरुणी चोरट्यांच्या जाळ्यात अडकली.

त्यानंतर या सायबर चोरट्यांनी कुणीतरी तुमच्या बँक अकाउंटवर पैसे पाठवत असल्याचं सांगत तरुणीला खाते पाहण्याच्या बहाण्याने एक ट्रँझॅक्शन करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी वेळोवेळी तरुणीकडून 25 लाख 61 हजार उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने सायबर पोलीस ठाणे गाठत या चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube