विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शाळेची वेळ बदलली, आता 7 ऐवजी केव्हा वाजणार घंटा?

Maharashtra School Timetable Changed : विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची ( Maharashtra School) बातमी समोर आलीय. येत्या 16 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. तर शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसह पालकांनी तयारी सुरू केली आहे. शाळेसाठी नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या आणि पुस्तकांची खरेदी देखील त्यांनी सुरू केली आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत (Maharashtra School Timetable Changed) महत्वाचा निर्णय […]

Maharashtra School

Maharashtra School

Maharashtra School Timetable Changed : विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची ( Maharashtra School) बातमी समोर आलीय. येत्या 16 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. तर शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसह पालकांनी तयारी सुरू केली आहे. शाळेसाठी नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या आणि पुस्तकांची खरेदी देखील त्यांनी सुरू केली आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत (Maharashtra School Timetable Changed) महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला असून आता सकाळी सात ऐवजी शाळा 9 वाजता सुरू होणार आहे.

शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्वापूर्ण निर्णय घेण्यात आलाय. येत्या 16 जूनपासून शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरूवात होणार आहे. तर नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल होत (School Time Changed) आहे. आता नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळा सकाळी 7 ऐवजी 9 वाजता भरणार आहेत अन् सायंकाळी 4 वाजता सुटणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 ही आता नव्या वर्षात शाळेची वेळ असणार आहे.

नवं वेळापत्रक कसं राहील?

शाळांच्या नव्या वेळापत्रकानुसार परिपाठ सकाळी 9 वाजल्यापासून ते 9.25 पर्यंत राहिल. सुरूवातीचे 3 लेक्चर 9.25 ते 11.24 पर्यंत होतील. छोटी सुट्टी 11.25 पासून ते 11.35 पर्यंत 10 मिनिटांची असेल. नंतरचे दोन लेक्चर 11.35 ते 12.50 या वेळेत होतील. मधली सुट्टी 12.50 ते 1.20 वाजेपर्यंत होईल. त्यानंतर उर्वरित लेक्चर 1.30 ते 3.55 वाजेपर्यंत होतील. त्यानंतर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये वंदे मारतम होईल अन् शाळा सुटेल.

16 जूनला शाळेची घंटा वाजणार

राज्यात लवकरच शाळेची घंटा वाजणार आहे. शेवटचे काही दिवस उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्या आता संपत आल्याने विद्यार्थी अन् पालकांना शाळेचे वेध लागले आहेत. राज्यात 16 जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाची पहिली घंटा वाजणार आहे. तर सीबीएसई बोर्डाची शाळा 9 जून पासूनच सुरू झाली आहे. राज्यात 11 जिल्हे वगळून सगळीकडेच 16 जूनपासून शाळा सुरू होणार आहे. इतर विभागांच्या तुलनेत विदर्भात थोड्या उशिराने शाळा सुरू होणार आहेत.

Exit mobile version