Maharashtra School : राज्यातील अनधिकृत शाळांना अल्टिमेटम, 30 एप्रिलपर्यंत शाळा बंद करण्याचे आदेश
ultimatum to illegal School : शासनाची मान्यता नसतानाही राज्यात अनेक शाळा सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या शाळांची मनमानी थांबविण्यासाठी शिक्षण विभागाने आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी आता थेट या शाळांना अल्टिमेटमच दिलाय. या शाळा 30 एप्रिलपर्यंत शाळा बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ही कारवाई करताना या शाळांची अधिकृतता तापासण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळेला राज्य मंडळाने दिलेली मान्यता, परवानगी, संलग्नता प्रमाणपत्र यांची तपासणी करण्यात यावी असे देखील या शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या आदेशामध्ये सांगण्यात आले आहे. ही तपासणी करण्याच्या सूचना मुंबई शिक्षण उपसंचालकांचे शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
उद्यापासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, शिक्षण मंत्र्यांची घोषणा</a>
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शासनाची मान्यता नसतानाही राज्यात अनेक शाळा सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या शाळा पालकांची अर्थिक फसवणूक करतात. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत. पालकांनी आपल्या पाल्याला अशा शाळांमध्ये दाखल करु नये, असे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान या शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद करून तसा अहवाल सादर करायचा आहे. तसेच ज्या शाळा बंद होणार नाही त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कारून त्यांना दंड ठोकण्यात येणार आहे. तर या शाळांनी दंडही भरला नाही तर शाळांवर सातबारा उतारा/ मालमत्ता पत्रकावर सदर रकमेचा बोजा चढवून सदर सातबारा उतारा मालमत्ता पत्रक ही कागदपत्रे शिक्षण उपसंचालक कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अनधिकृत शाळा कशी ओळखायची :
– शाळेच्या शासन मान्यतेची चैकशी करावी
– शाळेचा शासन मान्यता क्रमांक तपासावा
– शाळेच्या प्रवेशद्वारावर सर्व माहिती लावली आहे का? तपासावी
– शाळेवर शंका असल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालायात चौकशी करा