उद्यापासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, शिक्षण मंत्र्यांची घोषणा
Decision Of The State Government : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात सातत्यानं बदल होत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांचं तापमान काही दिवसांपासू 42 अंशावर गेले आहे. दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हाचा तडाखा सर्वांधिक असल्यानं घराबाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. त्यामुळे राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना 21 एप्रिल म्हणजे उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
तसेच इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल मागवला होता. त्यानुसार वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला.
दिपक केसरकर म्हणाले, केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यापुढे शासकिय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे.