Badlapur School : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मेहेर इंग्लिश स्कूलचा शहरातून मुकमोर्चा
Badlapur School : बदलापूर (Badlapur) येथे एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आले. त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शाळेतील मुलींचा संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नगर शहरातील हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलने (Meher English School) नगर शहरातून मुक मोर्चा काढून सदरघटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
या मुकमोर्चाचे नेतृत्व तीन वर्षाच्या गनिष्का चिलका हिने केले. हा मोर्चा शहरातील दादा चौधरी विद्यालय येथून पटवर्धन चौक, लक्ष्मी कारंजा, नवी पेठ, चितळे रोड मार्गे, जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी सदरचा मुख मोर्चा धडकला. या मुक मोर्चात विद्यार्थी, पालक , शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लाडक्या बहिणीला पैसे नको सुरक्षा द्या विविध फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी काळ्या फीत लावून या घटनेचा निषेध केला.
एका रात्रीत नोट बंदी केली जाते. लाॅकडाउन एकारात्रीत होत 1500 रुपयांचे आमिष दाखविले जाते. एकाच रात्रीत सर्व निर्णय घेतले जातात मग या आरोपीला का ? फाशी दिली जात नाही असं प्राचार्या अनुराधा झगडे यांनी प्रश्न उपस्थित केला.
एसआयटीची स्थापना
तर दुसरीकडे या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून एसआयटीची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. आरती सिंह (Aarti Singh) ,विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्यात येत असल्याची माहिती छेरिंग दोरजे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांनी दिली आहे. या प्रकरणात बदलापुर पुर्व पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 65(2),74,75,76 सह पोक्सो कायदा कलम 4 (2),8, 10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिला अध्यक्ष अन् दोन खासदार; भाजपाच्या पहिल्या अध्यक्ष निवडीचे पॉलिटिक्सही खास..
या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आरती सिंह,विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. राज्य सरकारने या प्रकरणात कारवाई करत गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.