शाळेवर राग काढू नका; चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर शाळा अध्यक्षांना अश्रू अनावर

शाळेवर राग काढू नका; चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर शाळा अध्यक्षांना अश्रू अनावर

Badlapur School:  बदलापूरच्या (Badlapur) एका नामंकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर  नागरिक आणि पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मंगळवारी सकाळी संतप्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येने शाळेवर मोर्चा काढला होता.  आंदोलकांनी शाळेच्या आता शिरत पेट्रोल ओतून शाळेचे वर्ग पेटवून देण्याचा प्रयत्न केला तसेच मोठ्या प्रमाणात शाळेची तोडफोड केली. तर दुसरीकडे या प्रकरणात आता शाळेचे अध्यक्षांनी देखील प्रतिक्रिया देत जे घडलंय ते घृणास्पद होता मात्र शाळेवर राग काढू नका असा आवाहन नागरिकांना केला आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात शाळेत जी घटना घडली ती निंदनीय आणि घृणास्पद आहे. आम्ही पोलिसांना जास्तीत जास्त सहकार्य करत आहोत. तसेच प्रशासन आणि मुलीच्या पालकांनाही आम्ही सहकार्य करत आहे आणि आमच्या शाळेतील यंत्रणा दुरुस्त आणि सुरक्षित कशा करता येतील, याचा विचार करत आहोत. असं शाळेचे अध्यक्ष म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, माझी सगळ्यांना विनंती आहे की, तुम्ही कुठल्यातरी गोष्टीचा राग या शाळेवर काढू नका. तुम्ही पण याच शाळेत शिकला आहात, मी पण… हे वाक्य  बोलताच त्यांना रडू आला आणि त्यांनी तेथून काढता पाय घेतला.

तापासाठी एसआयटी स्थापन :  देवेंद्र फडणवीस

बदलापूरमधील घटना निंदनीय असून शाळा कर्मचाऱ्याचं कृत्य निंदनीय आहे. या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, असाच राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाचा प्रयत्न आहे. घटना उघडकीस आल्यानंतर जी जी कारवाई केली पाहिजे. जी कारवाई झाली पाहिजे, तशीच कारवाई सुरु आहे. या केसच्या तपासासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आलीयं. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बदलापूर आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांकडून लाठीचार्ज तर, आंदोलकांकडून तुफान दगडफेक

बदलापूरची घटना 13 ऑगस्टला घडली असून ही घटना उघडकीस आल्यानंतर तत्काळ कारवाई सुरु झाली. या प्रकरणी कोणी दिरंगाई केलीयं का? त्याचा तपास केला जाईल. दिरंगाई करणाऱ्यांविरोधात अतिशय कडक कारवाई करण्यात येणार असून चौकशी जलदगतीने होणार ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube