Sanjay Raut : शिंदे फडणवीस सरकारमध्ये येऊन अजित पवार गटाला दहा दिवस उलटून गेले आहेत. आता या आमदारांना कोणती खाती द्यायची याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून या गटावर जोरदार टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका करत या आमदारांनी शरद पवारांची साथ का सोडली याचा खुलासा केला आहे.
राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवार गटातील आमदारांबाबत मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे साखर कारखाने, शिक्षण संस्था, दूध संघ आहेत. काही घोटाळेही आहेत. त्यातून बचाव व्हावा यासाठी ते अजितदादांबरोबर भाजपकडे गेले आहेत हे स्पष्ट आहे. अनेकांचे कारखाने अडचणीत आहेत. अनेकांच्या बँका डुबलेल्या आहेत. चौकशा लागल्यात त्या त्यांना थांबवायच्या आहेत. आता हसन मुश्रीफांच्या चौकशीचे काय होणार, याकडे लक्ष आहे, असे राऊत म्हणाले.
‘आमदारांंच्या कोटाची साईज बदलली, तरीही मंत्रीपद नाही’; राऊतांची खोचक टीका
निधी वाटपातून अजितदादा त्यांच्या माणसांना करतात गब्बर
ज्या खात्यांचा आग्रह अजित पवार गटाने धरला त्या खात्यांसाठी त्यांना दिल्लीतील नेत्यांनीच शब्द दिला आहे. आता ही कमिटमेंट पू्र्ण होते की नाही हे आपण पाहू. अजितदादांना अर्थ खाते सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. मला त्यांच्यावर टीका करायची नाही. पण, अजित पवार यांना अर्थ खाते सांभाळण्याचा आणि आपापल्या लोकांना निधी वाटपातून गब्बर करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे कदाचित मिंधे गटाच्या लोकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असेल.
.. तर असंतोषाचा भडका उडणार
मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही याचीच शंका आहे. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दोन्ही गटात असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या गटातले जे नेते मंत्री झाले आहेत ते सगळे वजनदार आहेत. त्यामुळे त्यांना तशीच खाती द्यावी लागतील. दुसरीकडे शिंदे गटातले आमदार आहेत ते किरकोळ आहेत त्यांना चणे कुरमुऱ्यावर भागवता येईल. त्यामुळे आताा विस्तार करणे म्हणजे नवीन असंतोषाला आमंत्रण देणे ठरेल, असे राऊत म्हणाले.
वळसेंना मतदारसंघात जाऊन उत्तर देणार; आमदार रोहित पवार आक्रमक