‘देवेंद्र फडणवीस’ म्हणून दाखवा, एक लाख देतो’; ठाकरे गटाच्या खासदाराचं राणेंना चॅलेंज!

Vinayak Raut on Narayan Rane : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. यावर आता खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांच्या ही टीका राणेंच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. राऊत म्हणाले, मला पंतप्रधान मोदी […]

मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे सज्ज; ठाकरेंच्या राऊतांचंही कडवं आव्हान

मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे सज्ज; ठाकरेंच्या राऊतांचंही कडवं आव्हान

Vinayak Raut on Narayan Rane : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. यावर आता खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांच्या ही टीका राणेंच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.

राऊत म्हणाले, मला पंतप्रधान मोदी यांचं वाईट वाटतं. मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात. पण, गल्लीतल्या कारट्याला मंत्री म्हणून बसवलं आहे. संसदे महाराष्ट्राची इज्जत गेली आहे. लोकसभेत महाराष्ट्राचा आवाज आहे. आम्ही पाच जण पांडवांप्रमाणे आपलं अस्तित्व दाखवून देतो. याच संसदेत महाराष्ट्र आणि मुळात कोकणातील एक मंत्री आहेत. त्यांना साधा अविश्वास शब्द उच्चारता येत नाही. हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हा शब्द उच्चारून दाखवावा. एक लाख रुपयांचं बक्षीस देतो, असे आव्हान राऊत यांनी राणेंना दिलं.

सत्ताधारी सरकारला नाना पटोलेंनी दिलं नवीन नाव; म्हणाले, ‘पूर्वी ईडीचं सरकार होतं आता..,’

तसे पाहिले तर नारायण राणे आणि ठाकरे गटातील नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरुच असतात. राणे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तशीच परिस्थिती ठाकरे गटातही आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातर नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यात चांगलाच हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. अरविंद सावंत यांनी केलेली टीका राणेंना चांगली झोंबली.  त्यानंतर राणेंनीही तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. थेट सावंतांची लायकी  काढण्यापर्यंत मजल गेली होती.

संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर हा वाद काहीसा शांत झाला होता. मात्र आता विनायक राऊत यांच्या विधानाने शांत होत असलेला वाद पुन्हा भडकण्याची शक्यता दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राणे प्रतिक्रिया देणार नाहीत असे होणार नाही. यावर आता राणे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शरद पवारांचा फोटो लावणारच, अजित पवार गटाची ठाम भूमिका

Exit mobile version