सत्ताधारी सरकारला नाना पटोलेंनी दिलं नवीन नाव; म्हणाले, ‘पूर्वी ईडीचं सरकार होतं आता..,’

सत्ताधारी सरकारला नाना पटोलेंनी दिलं नवीन नाव; म्हणाले, ‘पूर्वी ईडीचं सरकार होतं आता..,’

पूर्वी ईडीचं सरकार होतं आता येड्यांचं सरकार असल्याचं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीआधी नाना पटोले यांना माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

VIDEO: विमानाचा भीषण अपघात, दहा ठार; कसा झाला अपघात पाहा ?

नाना पटोले म्हणाले, येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीची पूर्वतयारी सुरु असून आम्ही आयोजक असल्याने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आलो होतो. घटकपक्षांना सोबत घेऊन कार्यक्रमाची योग्य तयारी करण्यासंबंधी चर्चा झाली. पूर्ण देशातून सात मुख्यमंत्री आणि व्हीआयपी बैठकीसाठी येणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे.

जे लोक आशिर्वाद मागताहेत, तेच साहेबांविरुध्द कटकारस्थान करायचे; अनिल देशमुखांचे टीकास्त्र

तसेच जे भाजपसोबत जातील ते संपतील, असं शरद पवारांना सांगायचं आहे. पवारांनी पंतप्रधानांबद्दल केलेलं विधान खरं आहे. पुन्हा येईन, म्हणालेले फडणवीस खाली आले तसंच मोदींचंही होईल. शरद पवार सोबत आहेतच जनतेत संभ्रम नको, अशी आमची भूमिका असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

Devara First Look: लांब केस अन् इंटेन्स लूक! सैफ अली खानच्या ‘Devara’चा फर्स्ट लूक आऊट

आता भाजपची उलटी गिनती सुरु झाली असून पूर्वी ईडीचं सरकार होतं आता येड्याचं सरकार झालं आहे. यांच्यात कसलाही समन्वय नाही, काही ताळमेळ नाही. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. येड्या सरकारमुळे जनता, शेतकरी, बेरोजगार, तरुण, गरीब त्रस्त आहेत, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केलायं.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात येत आहे. एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठका तर राष्ट्रवादीच्या संघटनासाठी शरद पवारांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या स्वाभिमान सभेची सुरुवात त्यांनी आज बीडमधून केली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भाजपसमोर एक मोठं आव्हानच असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube