बेस्ट ऑफ लक! बारावीनंतर आता आजपासून दहावीची परीक्षा सुरु…

SSC Exam

SSC Exam

<Maharashtra SSC Exam : काही दिवसांपूर्वीच बारावीची बोर्डाची परीक्षा सुरु झाल्यानंतर आता दहावीचीही बोर्डाची परीक्षा (SSC Exam) आजपासून सुरु होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 23 हजार 272 माध्यमिक शाळांमधील 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यी परीक्षेला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी तणामुक्त वातावरणात परीक्षा देण्याचं आवाहन माध्यमिक राज्य महामंडळाकडून करण्यात आलं आहे.

दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना सरकारी नोकरी नाहीच; Supreme Court कडून राजस्थान सरकारचा निर्णय कायम

मागील वर्षी राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. तब्बल 32 हजार 189 ने वाढ झाली आहे. यंदा खासगी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

महायुतीचे 13 शिलेदार ठरले : मुंबईतील चार अन् जळगाव, रावेर मतदारसंघात धक्कादायक नावे?

आजपासून दहावीची परीक्षा सुरु होत असल्याने माध्यमिक राज्य मंडळाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिकराव बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.

विधानसभा अध्यक्ष आले धावून; हिमाचलमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ फेल : सुख्खू सरकार थोडक्यात वाचले

दरम्यान, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी, प्रश्‍नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कधीपर्यंत हजर राहावे, यासंदर्भातील पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे राज्य मंडळातर्फे देण्यात आली आहेत.

काही दिवसांपूर्वीच दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत राज्य महामंडळाकडून परिक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. नियोजित वेळापत्रकानूसार बारावीच्या परिक्षा 21 फेब्रुवारी ते 22 मार्च तर दहावीची परिक्षा 1 मार्चपासून सुरु होत आहे. राज्य मंंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन माहिती दिली होती.

Exit mobile version