Download App

‘हॅलो नाही वंदे मातरम् आपल्याकडूनच शिकलो’; मुनगंटीवार अमित शहांसमोरच म्हणाले..

Sudhir Mungantiwar : राज्य सरकारकडून देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानार पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.

यावेळी प्रास्ताविकात बोलताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पुरस्कार देण्यामागचा उद्देश सांगितला. तसेच अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

नवी मुंबईत आज ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा, मंत्री अमित शाहांच्या हस्ते डॉ. धर्माधिकारींचा सन्मान

ते पुढे म्हणाले, मी अमित शहा यांना धन्यवाद देतो त्यांनी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याची सेवा करण्याची संधी दिली. अयोध्येत उभ्या राहणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी जे काही लाकूड लागणार आहे ते महाराष्ट्रातून जाणार आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

हॅलो नाही वंदे मातरम हे तर मी आपल्या कार्यालयाकडूनच शिकलो. आपल्या कार्यालयात कधीही फोन केला तरी समोरून आधी वंदे मातरम हेच शब्द ऐकायला मिळतात, असे मुनगंटीवार म्हणाले.

मंत्री अमित शाहंचं सोहळ्याला येण्यामागचं खरं कारण काय?

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी सरकारी कार्यालयात फोनवर आधी हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याचा आदेश जारी केला होता. सरकारी कार्यालयातून फोन करताना किंवा फोन घेताना आधी वंदे मातरमच  म्हणायचे असा त्याचा अर्थ होता. या आदेशावरही  विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती. सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली होती. त्यानंतरही सरकारने हा निर्णय घेतला होता.

हा निर्णय का घेतला त्यामागचे कारण काय याचे उत्तर आज मुनगंटीवार यांनी देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. अमित शहा यांच्या कार्यालयात केव्हाही फोन खणखणला तर आधी वंदे मातरम ऐकू येते ते पाहूनच आपण हा निर्णय घेतल्याचे मुनगंटीवार यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे.

 

Tags

follow us