नवी मुंबईत आज ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा, मंत्री अमित शाहांच्या हस्ते डॉ. धर्माधिकारींचा सन्मान

नवी मुंबईत आज ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा,  मंत्री अमित शाहांच्या हस्ते डॉ. धर्माधिकारींचा सन्मान

राज्य सरकारकडून देण्यात येणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा आज नवी मुंबईतील खारघरमधील सेंट्रल पार्कच्या मैदानात पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या हस्ते डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान होणार आहे.

सत्यपाल मलिकांच्या गंभीर आरोपांनंतरही रान उठवणारं भाजप चिडीचुप्प?

खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर 20 लाख श्रीसदस्यांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून नागरिक नवी मुंबईतील खारघरमध्ये दाखल होताना दिसून येत असून सोहळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची चोख अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Unseasonal Rain : पुढील तीन तास पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी झोडपणार

नागरिकांच्या वाहनांसाठी नवी मुंबईतील 21 मैदानात व्यवस्था करण्यात आली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कुटुंबीय कार्यक्रमासाठी शनिवारीच नवी मुंबईत आले. सागरी मार्गाने आलेल्या धर्माधिकारी कुटुंबीयांच्या स्वागतासाठी प्रशासकीय यंत्रणांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कर्नाटकमध्ये घड्याळाची ‘टिक-टिक’ चालणार; राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाकडून दिलासा

सोहळ्यासाठी सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त श्रीसदस्य उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे कार्यक्रमाची आखणी केली आहे. या सोहळ्यातून भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत असून एकंदरीत सोहळ्याची परिस्थिती पाहता भाजपला कोकणात विस्तार करण्याची मोठी संधी मिळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत

या सोहळ्यासाठी मुंबई-पुणे मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून हार्बरवर मार्गावारील मेगाब्लॉकही रद्द करण्यात आला आहे. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शाहा, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube