Unseasonal Rain : पुढील तीन तास पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी झोडपणार

Unseasonal Rain : पुढील तीन तास पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी झोडपणार

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी देखील देखील कोसळल्या आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. येणाऱ्या काही तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

आज शनिवारी पुन्हा हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही तास काही ठिकाणी विजा, गारा आणि वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा या जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 वाजेनंतर काही तास वादळीवाऱ्यासह गारपीटी होणार असल्याचा इशारा दिला आहे.

Mumbai-Pune Highway accident : अपघाताची पाहणी करताच मुख्यमंत्री शिंदेनी घेतला मोठा निर्णय…

दरम्यान एप्रिल महिना सुरु झाला आहे. तापमानाचा पारा वाढणार त्याआधीच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. यामुळे उन्हाचा तडाख्यापुर्वीच पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना देखील घडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने झाडे, विजेची पोल, विद्युत तारा या कोसळल्या असल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी घरांची पडझड देखील झाली यामुळे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. पावसाचं हे सत्र अद्यापही थांवण्याचं नाव घेताना दिसत नाही. आज देखील राज्यात अनेक ठिकाणी हावामान विभागाने हा अंदाज वर्तवताच पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली काही ठिकाणी गारा देखील पडल्याचं वाहायला मिळालं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube