Download App

माहिम मतदारसंघातून शिंदेसेनेचे सरवणकर अर्ज मागं घेणार का?, अमित ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर

अमित ठाकरे यावेळी म्हणाले आहेत ते माहिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. या मतदारसंघात शिवसेना शिंदे

  • Written By: Last Updated:

Amit Thackeray filed Nomination form Mahim Constituency : माहिम विधानसभा मतदारसंघात कोण अर्ज मागं घेणार याबद्दल मला काही कल्पना नाही. मी लोकांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे माझं काम मी करणार आहे. दरम्यान, तुम्हाला आदित्य ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत असं म्हणताच अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले माझ्याही त्यांना शुभेच्छा आहेत असंही अमित ठाकरे यावेळी म्हणाले आहेत ते माहिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर अर्ज मागं घेतली अशी चर्चा होती. परंतु, सध्यातरी तसं काही चित्र दिसत नाही.

माहिम मतदारसंघातून शिंदेसेनेचे सरवणकर अर्ज मागं घेणार का?, अमित ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. ‘माझा उमेदवारी अर्ज भरताना बरेच लोक आले होते. या माहीममध्ये मी लहानाचा मोठा झालो. अनेकांना मी काका बोलतो, ते सर्व हजर होते, मला बरं वाटलं’ असं अमित ठाकरे म्हणाले. ‘मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार. मी माझं व्हिजन घेऊन लोकांपर्यंत जाणार. 23 तारखेला लोक काय कौल देतात? ते समजेल’ असं अमित ठाकरे म्हणाले.

राजकीय सभांवर भर देणार की, दारोदार प्रचारावर, यावर अमित ठाकरे यांनी ‘दारोदार प्रचारावर भर असल्याच सांगितलं’. ‘सभांऐवजी मला प्रत्येक घरापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचायच आहे. वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, तो सार्थ करायचा आहे’ असं अमित ठाकरे यांनी सांगितलं. सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदा सवरणकर अजूनही विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

 

follow us