Download App

धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी; कोल्हापूर उत्तरमध्ये क्षीरसागर उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत

क्षीरसागर यांनी कोल्हापुरात पदाधिकारी मेळाव्यात प्रचाराचे रणशिंग फुंकलं. ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 : उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांना आहे. मात्र, आपली उमेदवारी गेल्या अडीच वर्षापूर्वीच फायनल झाली असून, येत्या 28 तारखेला शिवसेना शिंदे गटाकडून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अर्ज भरणार असल्याचं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

क्षीरसागर यांनी कोल्हापुरात पदाधिकारी मेळाव्यात प्रचाराचे रणशिंग फुंकलं. ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे पुन्हा विराजमान होणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु, शिवसैनिकांनी गाफील राहून चालणार नाही. रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी.

Maharashtra Election : पुणे पोलिसांची मोठी कारवाई, खासगी वाहनात पाच कोटी सापडले

गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला न्याय दिला.कोल्हापूरसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. लाडकी बहीण सारख्या योजनेतून महिलांचे सक्षमीकरण केलं. मुलींना मोफत शिक्षण, महिलांना एसटी प्रवासात निम्मे तिकीट, वृद्धांना वयोश्री योजना अशा योजना राबविण सर्वसामान्यांचे सरकार चालवलं. हेच काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सिद्ध करतं असंही ते म्हणाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ शिवाजी पेठेतून रोवली गेली आणि आजही शिवसेनेचा धनुष्यबाणच शिवाजी पेठवासीयांच्या मनावर कोरला गेला आहे यात शंका नाही. त्यामुळे गांधी मैदान, रंकाळा तलाव आदी प्रश्न मार्गी लावणे हे माझं कर्तव्य समजतो. शिवाजी पेठेच्या आणि कोल्हापूर शहराच्या विकासाचे ध्येय आपण ठेवले असून, हे ध्येय पूर्ण करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला.

follow us