Download App

महाराष्ट्र व तामिळनाडूत मुसळधार पावसाचा इशारा; हवामानात होणार पुन्हा बदल

Maharashtra Weather update: एक वेस्टर्न डिस्टर्बंन्स (Western Disturbance) म्हणजे पश्चिमी विक्षोभ आता ईशान्य दिशेकडे जात आहे. तसेच एक जेट्स स्ट्रीम म्हणजे जोरदार थंड हवा उत्तर भारतावर आहे. (IMD Weather Update) यामुळे पुढील काही दिवस राज्यामध्ये हवामान कोरडे असणार आहे. आणि तापमानामध्ये चार ते पाच डिग्री सेल्सिअसने पुन्हा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात या ठिकाणी कडाक्याची थंडी वाढणार आहे. (Winter Season In Maharashtra) उत्तर भारतात देखील थंडीची लाट कायम असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह मुंबई, सातारा, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची लाट कायम असणार आहे. एक वेस्टर्न डिस्टर्बंन्स म्हणजे पश्चिमी विक्षोभ आता ईशान्येकडे जात आहे.

तसेच एक जेट्स स्ट्रीम म्हणजे जोरदार थंड हवा उत्तर भारतावर आहे. वाऱ्याची चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानवर आहे. यामुळे संपूर्ण राज्यांमध्ये पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे 24 तासानंतर किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

येत्या 5 तारखेच्या सकाळनंतर किमान तापमान जवळजवळ 4 डिग्री सेल्सिअसणे घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच 5 तारखेनंतर आकाश संपूर्ण निळसर असणारं आहे. उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात 4 डिग्री सेल्सिअसणे मोठी घट होण्याची शक्यता आहे, त्यानंतर पुढील 2 दिवस तापमान थंड्या प्रमाणात राहणार असल्याची शक्यता आहे.

आमच्या आरक्षणावर डोळा ठेवला तर तुमची आमदारकी, खासदारकी घेऊ; पडळकरांचा इशारा

पुण्यात असे असणार हवामान: पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पुढील 5 ते 7 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच हलके धुके पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. तापमानत अंदाजे 4 डिग्रीने घट होण्याचा अंदाज आहे. 5 ते 7 फेब्रुवारीच्या दरम्यान तापमानातही मोठी घट होण्याची शक्यता आहे. देशात उत्तरेत थंडीचा कडाका कायम आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरात हा पाऊस होणार आहे. तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी मोठी हिमवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

follow us