मान्सूनमध्येही ट्विस्ट! मोसमी वारे दडी मारणार? 6 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट असतानाच हवामानात मोठा बदल

मान्सून वाऱ्यांचा वेग मंदावणार असून पुढील पाऊस 7 जून रोजी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Rain Alert

Rain Alert

Maharashtra Weather News : राज्यात अवकाळी पावसाने झोडपून काढलेले असतानाच मान्सूनने एन्ट्री (Maharashtra Weather) घेतली. जोरदार पाऊस सुरू झाला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर भाग व्यापून पुढील 24 तासांत हेच वारे विदर्भ गाठणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी अमरावती, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. परंतु, यातच एक नवी माहिती समोर आली आहे. मान्सून वाऱ्यांचा वेग मंदावणार असून पुढील पाऊस 7 जून रोजी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून येणारा मान्सूनचा दुसरा प्रवाह सिक्कीममध्ये प्रवेश करील. येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया होईल. महाराष्ट्रात जवळपास 45 टक्के भागात मान्सून व्यापला आहे. यानंतर विदर्भाकडे मान्सून वारे सरकू लागले आहेत. महाराष्ट्रात 30 मेपासून मात्र पुढील पाच ते सहा दिवस मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावणार आहे. वाऱ्यांचा पुढील प्रवास अतिशय मंद गतीने होत राहील. त्यामुळे राज्यात पाऊस काही दिवस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. तसेही कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलीच आहे.

मोठी बातमी! दहा दिवस आधीच मान्सूनची महाराष्ट्रात वर्दी, हवामान विभागाने दिल्या महत्वाच्या सूचना

उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात सक्रिय असणारे कमी दाबाचे क्षेत्र धिम्या गतीने पुढे सरकत आहे. मान्सून गंगेच्या पश्चिम बंगालमधील क्षेत्रासह सिक्कीम, ओडिशा या राज्यांत प्रवेश करेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येईल. राज्यात मान्सूनची वाटचाल मंद राहील असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या धुमाकूळ घालणारा पाऊस कमी होईल. पुढी पाऊस 7 जून रोजी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दहा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात..

केरळनंतर नैऋत्य मान्सून 25 मे रोजी मान्सून हा तळकोकणातील देवगडपर्यंत दाखल झाला आहे. महाराष्ट्र-गोव्यामध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण जी सरासरी तारीख (Rain Alert) आहे, ती 5 जून आहे. याच्या दहा दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. 2009 नंतर पहिल्यांदाच मान्सून महाराष्ट्रामध्ये इतक्या (Maharashtra Rain) लवकर दाखल झालाय. केरळमध्ये 2011 साली 29 मे रोजी तर महाराष्ट्रात 4 जून,2012 साली केरळमध्ये 05 जून तर महाराष्ट्रात सहा जून रोजी मान्सून महाराष्ट्रात धडकला होता.

पावसाचा जोर कायम राहणार; मराठवाडा, कोकण, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

Exit mobile version