Chandrashekhar Bawankule : राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा धक्का बसल्याने आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजपकडून पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन 21 जुलैरोजी बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडणार आहे.
या अधिवेशनात आगामी विधानसभा निवडणुकीवर मंथन होणार आहे. याचबरोबर राज्य व केंद्र सरकारने केलेली कामे यावर पक्षाचे नेते कार्यकर्तांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या अधिवेशनाला पाचहजार पेक्षाजास्त पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या अधिवेशनाचे उद्धघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित राहणार तर अधिवेशनाचा समारोप केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत होणार असल्याची देखील माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री कोण असेल?
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे आम्हाला कधी कधी लहान भावाची देखील भूमिका घ्यावी लागते. आम्ही आमचं काम करणार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण असेल यावर आम्ही निणर्य घेणार नाही. मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवण्याचा काम केंद्रीय नेतुत्व करेल असंही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
मुख्यमंत्रीबाबत महायुतीमध्ये एक मताने निर्णय होईल. सध्या महायुती सत्तेत येणे आवश्यक आहे. राज्यात एनडीएचे सरकार आहे. मोदीजी (PM Modi) पंतप्रधान आहे. जेव्हा राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा त्यांनी मोदी सरकारच्या आठ योजना बंद पाडले होते. त्यामुळे आता राज्यात महायुतीची सरकार महत्वाची आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय एकमताने होईल. असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
9 ते 15 ऑगस्टदरम्यान संवाद यात्रा
राज्यात भाजपकडून महाविकास आघाडीचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी 9 ते 15 ऑगस्टदरम्यान संवाद यात्रा काढली जाणार आहे. भाजप या दरम्यान 288 विधानसभा मतदारसंघांत जाऊन मतदारांशी संवाद साधणार असेही बावनकुळे म्हणाले.
पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; काय म्हणाले, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी?
तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकणार यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ आहे. आम्हा किती जागा मिळणार? याचा आकडा जनता ठरवेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल हे केंद्रीय नेतुत्व ठरवेल असं या पत्रकार परिषदेमध्ये बावनकुळे यांनी सांगितले.