पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; काय म्हणाले, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी?

पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; काय म्हणाले, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी?

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे अनेक गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध कारवाईला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. कारण, पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. (Avinash Dharmadhikari) तर, मसुरीतील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये त्यांना परत बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना बसलेल्या हा पहिला कारवाईचा धक्का आहे.

दोन जणांची निवड रद्द

या प्रशिक्षण संस्थेने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं आता स्पष्ट झालय. दुसरीकडे खेडकर कुटुंबीय पुण्याच्या बाणेरमधील बंगल्याला कुलूप लावून पळून गेले आहेत. तर, दुसरीकडे पूजा खेडकर यांची परतवारी सुरू झाल्याचं दिसून येत आहे. आता, याबाबत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनीही भूमिका मांडली आहे. तसंच, यापूर्वी दोन जणांची निवड रद्द झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रकरण गंभीर वर्णअभिमान विसरली याती, एकएकां लोटांगणीं जाती; पठाण कुटुंबाची ४८ वर्षांपासून पांडुरंगसेवा

पूजा खेडकर यांच्या अपंग आणि दिव्यांग प्रमाणपत्राचं प्रकरण गंभीर आहे, या गांभीर्याने सरकार पुढचे पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत पूजा खेडकर अजून कायम झालेल्या नाहीत, त्यांचं अद्याप प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे, राज्य सरकारने जे पाऊल उचललं आहे, ते योग्य आहे, असं अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे. तसंच, या प्रकरणात कोणताही दबाव येऊ नये, दूध का दूध पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणीही धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube