वर्णअभिमान विसरली याती, एकएकां लोटांगणीं जाती; पठाण कुटुंबाची ४८ वर्षांपासून पांडुरंगसेवा

वर्णअभिमान विसरली याती, एकएकां लोटांगणीं जाती; पठाण कुटुंबाची ४८ वर्षांपासून पांडुरंगसेवा

Ashadhi Ekadashi : कुरुळी तालुका शिरूर येथील पठाण कुटुंब गेली ४८ वर्षे ( Ekadashi ) खुटबाव संगम तालुका दौंड येथील पांडुरंगाची सेवा करत आहे. या कुटुंबाची संगम येथील संतराज महाराज देवस्थानवर व‌ पांडुरंगावर अपार श्रद्धा असून, सन १९७६पासून आजतागायत या (Ashadhi) कुटुंबाने पंढरीच्या पायी वारीची परंपरा जोपासली आहे.

 १ लाख वर्गणी शेतकरी सुखी राहू दे; मुख्यमंत्री शिंदेंचं विठूरायाला साकडं, नाशिकच्या अहिरे दाम्पत्याला पुजेचा मान

संगम येथील पांडुरंगाचं मंदिर जीर्णोद्धारासाठी या कुटुंबातील दिवंगत मुबारकभाई दाऊदभाई पठाण यांनी सन १९९३ मध्ये १ लाख रुपये वर्गणी दिली होती. त्यांनी सलग २१ वर्षे आषाढी वारीसाठी चोपदार म्हणून काम केलं होते. वारीमध्ये पायी चालत हातामध्ये राजदंड घेत वारकऱ्यांना शिस्त लावण्यामध्ये त्यांचा शिरस्ता असायचा. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा प्रमोद मुबारकभाई पठाण यांनी पंढरीच्या वारीची परंपरा आजतागायत जोपासली आहे.

 नाव प्रमोद ठेवलं

मुबारकभाई पठाण यांनी आपल्या मुलाने हिंदू धर्माचे सर्व सण, उत्सव साजरे करावेत म्हणून त्याचं नाव प्रमोद ठेवलं. प्रमोद पठाण हे संतराज महाराज संस्थांनचे विश्वस्त असून, संस्थांनच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. प्रमोद यांच्या कुटुंबाचा आषाढी वारीसाठी वेळापूर येथे असणाऱ्या अन्नदानासाठी कुरुळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंक्तीमध्ये सहभाग असतो.

मुस्लिम चोपदार विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 12 वी उत्तीर्णांसह पदवीधरांनाही दरमहा पगार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पायजमा कुर्ता व डोक्यावरती लाल टोपी असणारे मुबारकभाई पठाण हे वर्षभर संगम येथे धार्मिक कार्यक्रमात असायचे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजातील पहिले पालखी चोपदार म्हणून ते प्रसिद्ध होते. आपल्या राजदंडाच्या इशाऱ्यावर त्यांनी कित्येकदा पालखी सोहळा सुखकर केल्याच्या आठवणी अनेक वारकरी सांगतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube