Download App

तेलंगणातील विजयाची माणिकराव ठाकरेंना बक्षीशी, तब्बल तीन राज्यांच्या प्रभारीपदांची जबाबदारी

  • Written By: Last Updated:

Manikrao Thackeray : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha elections) काँग्रेस (Congress) पक्षाने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलांतर्गत प्रियंका गांधी वाड्रा यांच्या जागी अविनाश पांडे यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर तेलंगणातील विजयानंतर माणिकराव ठाकरे यांना तीन प्रदेशांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेलीचे प्रभारीपद माणिकराव ठाकर (Manikrao Thackeray) यांना देण्यात आलं.

राज्यात कोरोनाचे आणखी रुग्ण वाढले, डॉ. गंगाखेडकर यांच्याकडे टास्क फोर्सची जबाबदारी 

2013 मध्ये तेलंगणाची निर्मिती झाल्यापासून के. चंद्रशेखर राव यांची सत्ता होती. मात्र, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केसीआर यांचा पराभव केला. तेलंगणामध्ये काँग्रेसने 119 पैकी 64 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. तेलंगणातील विजयामुळे काँग्रेसने दक्षिण भारतात आपला पाया आणखी मजबूत केला आहे. काँग्रेसच्या या विजयात प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. केसीआर यांची 10 वर्षांची सत्ता उलथून टाकण्याचे आव्हान ठाकरेंनी लीलया पेललं. त्यामुळे आता त्यांच्याकडे तीन राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेलीचे प्रभारीपद ठाकरेंना देण्यात आलं.

माणिकराव ठाकरेंची कारकीर्द?
माणिकराव ठाकरे हे 1989 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 1993 ते 1995, 1999 ते 2003 आणि 2003 ते 2004 या काळात ते राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे कृषी, फलोत्पादन, गृह मंत्रालय अशी खाती होती. 2008 मध्ये ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर 2009 ते 2018 या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. जानेवारी 2023 मध्ये पक्षाने तेलंगणाचे प्रभारी बनवून मोठी जबाबदारी दिली. तर आता त्यांना तीन राज्यांचं प्रभारी केलं.

प्रियंका गांधींकडे कोणतीच जबाबदारी नाही
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी बनवण्यात आले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा प्रभाव पडला नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. तसेच, त्याच्याकडे इतर कोणतेही राज्य नियुक्त केलेले नाही.

फेसबुक-इन्स्टाग्रामला ठोठावला कोट्यावधींचा दंड, यूट्यूब-गुगलवरही कडक कारवाई 

कोणत्या राज्याची जबाबदारी कोणाकडे आहे?
मुकुल वासनिक – गुजरात,

जितेंद्र सिंग – आसाम आणि मध्य प्रदेश

रणदीपसिंग सुरजेवाला – कर्नाटक

कुमारी सेजला-उत्तराखंड

जीए मीर – झारखंड आणि पश्चिम बंगाल

दीपा दासमुन्शी – केरळ, लक्षद्वीप आणि तेलंगणा

डॉ. एक. चेल्लाकुमार – मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश

अजोय कुमार – ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी

भरतसिंग सोलंकी – जम्मू- काश्मीर

राजीव शुक्ला – हिमाचल प्रदेश आणि चंदीगड

सुखजिंदर सिंग रंधवा – राजस्थान

देवेंद्र यादव-पंजाब

गिरीश राय चोडणकर – त्रिपुरा, सिक्कीम, नागालँड, मणिपूर

मणिकम टागोर – आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार

 

Tags

follow us