Manoj Jarange Challenge to Government after Abrupt suspension of fast : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी त्यांचे उपोषण अचानक स्थगित (Abrupt suspension of fast) केले आहे. आपण सलाईन लावून उपोषण करण्यापेक्षा मी आता 40 आमदारांना पाडण्याची तयारी करतो. असं आव्हान (Challenge) जरांगे यांनी सत्ताधऱ्यांना दिलं आहे. ते आंतरवाली सराटी या त्यांच्या गावातून उपोषण स्थगित केल्यानंतर बोलत होते.
ठाकरे-परबांवर खोटे आरोप करण्यासाठी दबाव; फडणवीसांचं नाव घेत देशमुखांचे आरोप
यावेळी जरांगे म्हणाले की, माझी प्रकृती रात्रीपासून अस्थिर होत आहे. मात्र मला डॉक्टरांकडून बळजबरी सलाईन लावण्यात आला आहे. मात्र असं उपोषण करण्यात काही अर्थ नाही. तसेच माझ्या लोकांनी मला उपोषण थांबवण्याचा आवाहन केलं. तुम्ही असाल तरच सरकार आम्हाला आरक्षण द्यायला असं त्यांचं म्हणणं आहे. पण उपोषण हीच माझी शक्ती आहे. त्यामुळे सलाईन लावून उपोषण करण्यात अर्थ नाही. म्हणून मी हे उपोषण थांबवलं आहे.
Sai Tamhankar: ‘ब्लॅक ब्युटी’; सई ताम्हणकरची दिलखेच अदा, पाहा फोटो
मात्र मला सलाईन लावलं नाही. तर मी हे उपोषण असेच सुरू ठेवीन. तसेच उद्या मला सरकारने मारलं किंवा मी मेलो तरी मी समाजाच्या कामी येणार आहे. इथं पडून राहण्यापेक्षा मी 40 आमदारांना पाडण्याची तयारी करतो. तसेच आपले प्रश्न मांडण्यासाठी आपले प्रतिनिधी हवेत. भाजपामधील मराठ्यांचे चार-पाच माकडं आहेत त्यांना मी उत्तर देत नाही. मात्र मी आता त्यांना पाडून दाखवतो त्याशिवाय ते ठेक्यावर येणार नाही.
तसेच आरक्षण मिळाल्यानंतर पहिला गुलाल अंतरवाळीमध्येच उधळला जाईल मी गाव सोडून जात नाही समाजालाही सोडत नाही. सरकारला 13 जून ते 13 ऑगस्ट पर्यंत दोन महिन्याचा वेळ दिला आहे. मात्र अद्यापही आरक्षण मिळाले नाही तसेच मी उपोषणाला बसल्यानंतर डॉक्टरांनी मला बळजबरी सलाईन लावला आहे त्यामुळे मी आता पाडापाडी सुरू करणार आहे. असं म्हणत जरांगे यांनी उपोषण सोडताच सरकारला आव्हान दिलं आहे.