Download App

‘यावेळेस नारायण राणेंना सुट्टी मात्र…’, मनोज जरांगेचा कडक शब्दात इशारा

Manoj Jarange Patil On Narayn Rane : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे होणार नसल्याचा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सरकार आरक्षणासाठी सकारात्मक हे आम्हालाही माहिती मग अधिसूचना काढूनही त्याची अमलबजावणी होत नसल्याने जनता शिंदे फडणवीसांवर नाराज आहे, एवढ्या वेळेस नारायण राणेंना सुट्टी मात्र, मर्यादा आहेत, म्हणून शांत पण भविष्यात सोडणार नाही. निलेश राणेंना विनंती की त्यांनी त्यांना थांबवावे. अशा कडक शब्दात मनोज जरांगेनी (Manoj Jarange ) इशारा दिला.

कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र आणि नोंदी नसलेल्यांना आरक्षण नाही, असा जर शिंदे फडणवीसांमध्ये गोड गैरसमज असेल तर तो त्यांनी तातडीने दूर करून घ्यावा. अधिसूचना काढता मग त्याची अंमलबजावणी का करत नाही. असं जरांगेनी म्हटलं आहे. याआधी अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू होते. यावेळी त्यांनी पाणीही न घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, जरांगे यांनी मंगळवारी (13) संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. महाराष्ट्रात यापुढं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा जरांगेनी दिला होता. नुसते नाटकं सुरू आहेत, तुम्हाला मराठे सोपे वाटतात का, असा सवालही जरांगेंनी केला होता. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती.

मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं राणे म्हणाले होते. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने नुकताच अध्यादेश जारी केला होता. या अध्यादेशाचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. तसंच अधिवेश घेण्यासही चालढकल केली जात आहे. त्यामुळं जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला असून नरेंद्र मोदी यांची सभा राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या वक्तव्यावर राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. नारायण राणे यांनी ट्विटरवर भूमिका मांडली आहे. यात त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली होती.

जरांगेच्या डोक्यावर परिणाम, तो काहीही बडबड करतोय, त्याने औकात ओळखावी; राणेंची घणाघाती टीका

राणे यांनी लिहिलं की, मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव! तेव्हा असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरूणावर पडून राहून नाटके करावीत, असं ट्वीट राणे यांनी केलं होतं.

follow us