Download App

कर्जमाफी देणार नसाल तर गावबंदी, मनोज जरांगेंनी दिला सरकारला गंभीर इशारा

Manoj Jarange Demands Farmers Karj Mafi To state government : राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून (Farmers Karj Mafi) रान पेटणार, असं दिसतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्ष कर्जमाफी करता येणार नाही, असं म्हटलंय. आता, त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागलेत. शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) देखील सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आवाज उठवला आहे. त्यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिल्याचं समोर आलंय. आज त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmers Loan Waived) देणार नसाल, तर गावबंदी मोहीम हाती घेणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

नौसेनेच्या झेंड्यातल गुलामीचं प्रतिक गाडलं; आता ‘त्या’ झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य झळकतय

शेतकऱ्यांनी कर्जमाफी करण्याची मागणी केली असली तरी परिस्थिती बघून निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी इथून पुढे स्वतःचं हित पाहावं असं म्हणत जर हे संपूर्ण कर्जमुक्ती करणार नसेल, तर आंदोलन हाती घेऊन यांना गाव बंदी करू, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

कर्जमाफी देणार नसाल तर गावं बंदी मोहिम हाती घेणार असल्याचा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्याचबरोबर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ईसीबीसीतून लिंक सुरु करून देण्याचा शासन निर्णय काढला. त्यामुळे जरांगेंनी मंत्री मरलीधर मोहळ आणि आशिष शेलार यांचे आभार मानले आहे. असाच आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असंही जरांगे यांनी म्हटलंय.

Video : पंतप्रधान मोदी यांचं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाबद्दल मोठ विधान; म्हणाले, तो कधीही न मिटणारा…

दरम्यान, गोदावरी बंधाऱ्यात पाणी नसल्याने गोदापट्ट्यातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, गोदा बंधाऱ्यात पाणी सोडावं, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. शिवाय संपूर्ण कर्जमाफी केली नाही, तर गावबंदी करू असा देखील इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.

 

follow us