नौसेनेच्या झेंड्यातल गुलामीचं प्रतिक गाडलं; आता ‘त्या’ झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य झळकतय

PM Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (PM Modi) मुख्यालयातील स्मृति मंदिरात संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव गोळवलकर यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ते दीक्षाभूमीला गेले आणि तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
आज आपण पाहतोय की भारत कशाप्रकारे गुलामगिरीच्या मानसिकतेला सोडून पुढे जातोय. गुलामीच्या निशाण्यांची ज्या हिन भावनेत 70 वर्षांपासून पेरणी केली जात होती, त्यांच्या जागी आता राष्ट्रीय गौरवाचे नवे अध्याय लिहिले जात आहेत. ते इंग्रजी कायदे ज्यांना भारताच्या लोकांना अपमानित करण्यासाठी बनवलं गेलं होतं, देशाने त्यांना बदललंय. गुलामीच्या विचारांनी बनलेल्या दंड संहितेच्या जागी आता भारतीय न्याय संहिता लागू झाली आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
Video : पंतप्रधान मोदी यांचं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाबद्दल मोठ विधान; म्हणाले, तो कधीही न मिटणारा
आपल्या लोकशाहीच्या प्रांगणात आता राजपथ नाही कर्तव्यपथ आहे. आपल्या नौसेनेच्या ध्वजातही गुलामीचं चिन्ह छापलेलं होतं. त्याची जागा आता नौसेनेच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक फडकतंय. अंदमानचे द्विप जिथे वीर सावरकरांनी राष्ट्रासाठी यातना सहन केल्या, जिथे नेताजी सुभाष बाबूंनी स्वातंत्र्याचं बिगुल वाजवलं, त्या द्विपांची नावंसुद्धा आता स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणात ठेवली आहेत असंही ते म्हणाले.
महान संत गुलाबराव महाराज यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. तरीही त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. दिसत नसतानाही त्यांनी एवढी पुस्तकं कशी लिहिली? त्यांच्याकडे नेत्र नव्हते. पण दृष्टी होती. ही दृष्टी बोधातून येते. विवेकातून प्रकट होते. ही दृष्टी व्यक्तीसोबत समाजाला शक्ती देते. आपला संघही असा संस्कार यज्ञ आहे. जो अंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टीसाठी आपण माधव नेत्रालयला पाहतो. आणि अंतरदृष्टीने संघाला सेवेचा पर्याय दिला आहे.