Download App

‘मुख्यमंत्र्यांवर विश्वास मात्र त्यांचे ओएसडी…’ मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीकरिता पुन्हा एकदा मनोज जरांगे

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीकरिता पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरू केले आहे. आज (12जून) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता. आज त्यांनी एक पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी (CEO) मंगेश चिवटे (Mangesh Chivte) यांच्यावर गंभीर आरोप केल्याने एकच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मराठ्यांविरोधात षडयंत्र रचून मुख्यमंत्र्यांनाही बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा देत आम्ही विधानसभेच्या तयारीला लागू असं म्हटले आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास विशेष कार्यकारी अधिकारी मराठा समाजाच्या काही लोकांना दिल्लीला घेऊन पळत आहे आणि तिकडे आरक्षणासंबंधीचा काही मसुदा तयार करण्याचे काम करत आहे अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. आमच्या लोकांची त्यात काही चूक नाही त्यांना बळीचा बकरा बनविण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा समजा विरोधात षडयंत्र रचून त्यांना बदनाम करण्याचे काम विशेष कार्यकारी अधिकारी करत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे.

पुढे पाटील म्हणाले, राजकारण आमचा अजेंडा नाही. आम्हाला आमची लेकरे मोठी करायची आहेत यामुळे सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा हीच आमची मागणी आहे मात्र दरवेळी सरकारकडून कार्यवाही सुरु आहे असं सांगण्यात येते. यामध्ये ओबीसी नेतेही खोडा घालत आहेत मात्र कुणबी हेच मराठा आहे आणि मराठा हेच कुणबी आहे हे समजून घ्यायला ते तयार नाही. आता काही नेत्यांना प्रसिद्धी मिळत नाही त्यामुळे ते अंतरवालीवरच बोलतात त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

तटकरे तुम्ही आतल्या गाठीचे; आव्हाडांनी ठरलेला शब्द न शब्द सांगितला

मात्र सरकार गोड बोलून मराठ्यांचा काटा काढण्याचे काम करत आहे. तातडीने मार्ग काढू म्हणायचे आणि कठोर आमरण उपोषणाचे दिवस वाढवायचे हा सरकारचा डावसुद्धा असू शकतो. जर सरकारने आमच्या उपोषणाची दखल घेतली नाहीतर आम्ही चांगला कचका त्यांना दाखवू असेही जरांगे पाटील म्हणाले. तसेच जर राज्य सरकार आम्हाला खेळवत राहिले तर आम्ही विधानसभेच्या तयारीला लागू असा इशाराही त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला.

follow us