तटकरे तुम्ही आतल्या गाठीचे; आव्हाडांनी ठरलेला शब्द न शब्द सांगितला

तटकरे तुम्ही आतल्या गाठीचे; आव्हाडांनी ठरलेला शब्द न शब्द सांगितला

Jitendra Awad On Sunil Tatkare : राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केलेल्या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी उत्तर देत तटकरे तुम्ही इतके आतल्या गाठींचे कसे आहे ? असा प्रश्न विचारला आहे.

पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तटकरेंनी माझा नाव घेतला नाही पण मी अजित पवारांचा (Ajit Pawar) नाव घेतला असा उल्लेख त्यांनी केला मात्र अजित पवारांचा नाव घेऊन माझ्यावर तटकरेंनी हल्ला केला ते त्यांची सवय आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाकडे बघावा असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, तटकरे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मागे लागले होते भाजपमध्ये जाण्यासाठी त्यामुळे साहेबांनी त्यांना तारखा दिल्या. साहेबांकडे 2009 ला तुम्ही फॅार्म्युला दिला होता तसेच 2014 ला सुद्धा तुम्हीच भाजपमध्ये जाण्यासाठी साहेबांच्या मागे लागले होते आणि 2019 मध्ये देखील तुम्हीच फॅार्म्युला आणला होता भाजपमध्ये जाण्यासाठी असेही आव्हाड म्हणाले.

तुम्ही आरआरएसला उत्तर देऊ शकत नाही

तुम्ही विचारधारा सोडली त्यामुळे तुमचे हे हाल होत आहे. आज तुमच्या पक्षाबद्दल आरआरएस म्हणत आहे तुमचा पक्ष ओझे झालं आहे मात्र तुम्ही आरआरएसला उत्तर देऊ शकत नाही जर तुमच्यात हिम्मत असेल तर आरआरएसला उत्तर द्या असा आव्हान देखील यावेळी आव्हाडांनी तटकरेंनी दिला.

तुम्ही भुजबळ यांना सांगतात तुम्ही राज्यभर फिरा मात्र छगन भुजबळ यांना राज्यसभा मिळणार नाही. तुमच्या पक्षात काय चालत आहे तुम्ही हे बघा असं म्हणत त्यांनी तटकरेंना टोला लावला. तसेच तुम्ही जाहीर भाषणात खोटं कसं बोलू शकतात? तटकरे तुम्ही इतके आतल्या गाठींचे कसे आहे? असा प्रश्न देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये विचारला.

शरद पवारांना कधीच जातीयवादी पक्षासोबत जायचे नव्हते मात्र तुम्हीच सकाळी सकाळी साहेबांकडे जाऊन भाजपमध्ये चला असं म्हणत होते. तुम्ही सत्तेसाठी साहेबांच्या मागे होतात मात्र साहेब तुम्हाला आशेचा किरण दाखवत राहिले त्यामुळे तुम्ही चिकटून साहेबांसोबत राहिले आणि नंतर भाजपसोबत गेले असा खुलासा देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला.

उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय, विधानसभा निवडणुकीत लढवणार 288 जागा?, पदाधिकाऱ्यांकडून मागवला अहवाल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज